आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्दिक पटेल विवाहित, मसुरीमध्ये Honeymoon साजरा केला; पाटीदार बांधवानेच केला आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - पाटिदार आरक्षण आंदोलनातून समोर आलेला पाटीदार नेता हार्दिक पटेलच्या विरोधात पाटीदार समाजाची नाराजी समोर येत असल्याचे दिसत आहे. या परिस्थितीमध्ये दिल्लीतील एक पाटीदार अश्विन सांकडशेरिया याने हार्दिक पटेलवर गंभीर आरोप केले. आहे. व्हिडिओमध्ये त्याने म्हटले आहे की, हार्दिकने 25 ऑगस्टच्या आधीच लग्न केले होते आणि मसुरीच्या एका हॉटेलमध्ये तो हनिमून साजरा करायला गेला होता. मार्च 2016 मध्ये किंजल पटेल नावाच्या मुलीबरोबर त्याचा साखरपुडा होणार अशा बातम्या आल्या होत्या. पण साखरपुडा झाला नाही. पण आता त्याच्यावर विवाहित असून त्याने साखरपुडाही साजरा केला असा आरोप करण्यात आला आहे. 
 
IB ने चौकशी करावी.. 
दिल्लीत राहणारा आणि पाटिदार आरक्षण संघर्ष समितीचा कन्व्हेनर अश्विन सांकडशेरिया यांनी भास्करशी बोलताना सांगितले की, हार्दिक दिल्लीला माझ्याकडे आला होता. त्याच्याबरोबर आलेली महिला त्याची पत्नी अशल्याचे त्याने सांगितले होते. तसेच त्या महिलेसाठी कपडे खरेदी करायचे सांगत त्याने खरेदीही केली होती. याची माहिती मी IB ला दिली होती. आजही मी म्हणतो की, आयबीने त्या हॉटेलमध्ये तपास केल्यास अनेक खुलासे होऊ शकतात. 

हार्दिकला चॅलेंज.. 
अश्विन सांकडशेरिया म्हणाले की, मी हार्दिकला चॅलेंज करतो की, जर माझे आरोप खोटे ठरले तर पुन्हा गुजरातमध्ये पाऊल ठेवणार नाही. जर तो खोटा ठरला तर त्याने या आंदोलनातून बाहेर पडावे. व्हायरल व्हिडिओमध्ये सांकडशेरिया म्हमाले, हार्दिकने समाजाची दिशाभूल करण्याशिवाय काहीही केले नाही. संबंधित ऑडियो क्लिपमध्ये जी नावे आहेत, ते सर्व यात सहभागी आहेत. 

हनिमूनची संपूर्ण व्यवस्था मीच केली.. 
सांकडशेरिया म्हणाले, हार्दिक जर एवढा स्वच्छ चारित्र्याचा असेल तर त्याने माझ्या समोर यावे. मी 100 % खरे सांगतोय. 2015 च्या मे महिन्यातील पहिल्या आठवड्यात आंदोलनाच्या दोन तीन महिन्यांपूर्वी तो कारने दिल्लीला आला होता. आम्ही सोशल मीडियातील काही मित्र होते. तो मला म्हणाला कपड्यांची खरेदी कुठून करू? त्याने कॅनॉट प्लेसमधून त्याच्या पत्नीसाठी कपडे खरेदी केले. त्याने परिचय करून देत ती महिला पत्नी असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने मसुरीमध्ये हनिमूनसाठी चांगले रिसॉर्ट कुठले ते विचारले. तेव्हा मी त्याची संपूर्ण व्यवस्था केली होती. मसुरीच्या ज्या हॉटेलमध्ये तो थांबला होता, त्याठिकाणी रजिस्टरवर त्याच्या सह्यादेखिल आहेत. 

माझ्या पाया पडला होता...
त्यानंतर मी 8 ऑगस्टला मेहसाणाला आलो तेव्हा अवसरा पार्टी प्लॉटच्या बाहेर हॉटेलमध्ये तो मला म्हणाला, तुम्ही आले तर सांगितलेही नाही. त्यावेळी मी त्याला विचारले तू तर सांगत होता की तुझे लग्न झाले आहे, मग आता काय झाले? त्यावेळी तो माझ्या पाया पडू लागला आणि म्हणाला, अश्विन भाई हे कोणालाही सांगू नका. मी संपूर्ण विचार करून हार्दिकवर हा आरोप करत आहे. समाजातील लोकांचा विश्वासघात करणाऱ्याला मी सोडणार नाही. त्याने समाजाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवली आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा PHOTOS.. अखेरच्या स्लाइडवर अश्विन यांचा व्हिडिओ..

 
बातम्या आणखी आहेत...