आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षरधाम मंदिरावरील हल्ल्याच्या मास्टरमाइंडला 15 वर्षांनी अटक, गेले होते 32 निष्पापांचे प्राण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अब्दुल रशीद अजमेरी रियादमध्ये राहत होता. त्याचा भाऊ अजमेरी अदमदेखिल या प्रकरणात आरोपी होता. त्याला SC ने निर्दोष मुक्त केले आहे. - Divya Marathi
अब्दुल रशीद अजमेरी रियादमध्ये राहत होता. त्याचा भाऊ अजमेरी अदमदेखिल या प्रकरणात आरोपी होता. त्याला SC ने निर्दोष मुक्त केले आहे.
अहमदाबाद - 15 वर्षांपूर्वी गांधीनगरमधील अक्षरधाम मंदिरावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याचा मास्टरमाइंड अब्दुल रशीद अजमेरीला शनिवारी सकाळी अटक करण्यात आली. तो सौदी अरबच्या रियादहून अहमदाबादला आला होता. एअरपोर्टवरच क्राइम ब्रँचने त्याला अटक केली. या हल्ल्यामध्ये 32 निष्पापांचे प्राण गेले होते. 

सुप्रीम कोर्टातून झाली होती भावाची सुटका 
- अब्दुल रशीद अजमेरी रियादमध्ये राहत होता. त्याचा भाऊ अजमेरी अदमदेखिल या प्रकरणात आरोपी होता. कनिष्ठ कोर्टात त्याला दोषी ठरवण्यात आले होते. पण 2014 मध्ये सुप्रीम कोर्टात त्याची निर्दोष मुक्तता झाली होती. 

3 कमांडो, 1 कॉन्स्टेबल झाले होते शहीद 
- 24 सप्टेंबर 2002 मध्ये काही दहशतवादी अक्षरधाम मंदिरात घुसले होते. दहशतवाद्यांनी अॅटोमॅटिक वेपन्स आणि हँड ग्रेनेडच्या वापरासह एक आत्मघातकी हल्लाही केला होता. या घटनेत एकूण 32 जणांचे प्राण गेले तर 79 जण जखमी झाले होते. ज्यावेळी हा हल्ला झाला, त्यावेळी मंदिरामध्ये जवळपास 600 लोक उपस्थित होते. 
- या दहशतवादी हल्ल्यामध्ये 3 कमांडो आणि स्टेट रिझर्व्ह पोलिस (SRP) चा एक कॉन्सटेबलही शहीद झाला होता. 

 
बातम्या आणखी आहेत...