आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Auction Of Gift\'s Of PM Modi For Ganga Cleaning Mission

मोदींचे नाव असलेल्या सूटसाठी एक कोटींची बोली, हिरे व्यापाऱ्याने दिला होता भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत - प्रजासत्ताकदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातलेल्या बहुचर्चित सूटसाठी एक कोटींपर्यंत बोली लावण्यात आली आहे. सूरतचे व्यापारी सुरेश अग्रवाल यांनी ही बोली लावली आहे. उद्या संध्याकाळपर्यंत बोली लावता येणार असून. 20 तारखेला सूटचा अंतिम लिलाव होईल. दरम्यान या सूटबरोबरच मोदींच्या 455 वव्सू प्रदर्शनात ठेवण्यात आल्या असून, त्यांचाही लिलाव होणार आहे. त्यातून मिळणारी रक्कम गंगा स्वच्छतेवर खर्च होईल.
फोटो - लिलावासाठी ठेवण्यात आलेल्या मोदींच्या सूटसह उपस्थित मान्यवर.
मोदींचे नाव असलेल्या ज्या सूटवरून मोठा वाद निर्माण झाला होता, तो सूट मोदींना भेट म्हणून दिला होता असे हिरे व्यापारी रमेश विराणी यांनी स्पष्ट केले आहे. आपल्या मुलाच्या लग्नासाठी मोदींना हा सूट भेट म्हणून दिला होता असे ते म्हणाले आहेत. तसेच सूट मुलाने खरेदी केल्याने त्याची नेमकी किंमत आपल्याला माहिती नाही. पण तरी तो 10 लाखाचा नसेल असेही ते म्हणाले आहेत.
अशा प्रकारचा सूट भेट म्हणून देण्याची कल्पना मुलगा स्मित विराणी याची होती. त्यालाच त्याची किंमत माहिती आहे. पण मोदींनी माझ्या मुलाच्या विवाह सोहळ्यात तो सूट परिधान केला होता. त्यामुळे आमच्यासाठी तो अनमोल आहे, असे विराणी यांनी म्हटले आहे. व्हायब्रंट गुजरात परिषदेवेळी त्यांना हा सूट दिला होता असेही त्यांनी सांगितले.

सूरतचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र कुमार म्हणाले, या भेटवस्तूंचे प्रदर्शन सायन्स सेंटरमध्ये बुधवारपासून सुरू होईल. मोदींनी पंतप्रधान म्हणून मिळालेल्या 455 भेटवस्तू लिलावासाठी सूरतला पाठवल्या आहेत. यामध्ये एक सोन्याची, चांदीच्या 13 कपड्यांच्या 237 भेटवस्तू आहेत. बराक ओबामा यांच्या भेटीवेळी घातलेल्या सूटचाही यात समावेश आहे. प्रदर्शनात पंतप्रधानांना मिळालेल्या 455 गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना मिळालेल्या 361 भेटवस्तू आहेत.

याआधीही झाला होता लिलाव
मोदींना मिळालल्या भेटवस्तंुचा लिलाव करण्याची ही पहिलीच वेळ नाही. मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यावेळीही त्यांना मिळालेल्या भेटवस्तुंचा लिलाव करण्यात येत होता. त्यावेळी या लिलावातून मिळणारा पैसा गुजरातच्या विकासासाठी वापरला जात होता.
दरम्यान, काँग्रेसने हिरे व्यापाऱ्याच्या दाव्यावर टीका केली आहे. एवढ्या अधिक किमतीचा सूट देण्यामागचा उद्देश तपासणे गरजेचे आहे. एखादे काम करण्यासाठी हा सूट दिलेला असू शकतो, ते काम झालेले असेल किंवा व्हायचे आहे का? हे तपासायला हवे असे काँग्रेसचे अजय माकन म्हणाले आहेत.
पुढील स्लाइड्वर पाहा प्रदर्शनाचे व मोदींच्या सूटचे PHOTO