अहमदाबाद- देशातील वाढत्या असहिष्णुतेविरुद्ध साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याची मालिका सुरू असताना गुजरातमधील प्रसिद्ध साहित्यिक गणेश देवी यांनीही याच कारणामुळे पुरस्कार परत केला. मात्र, आता त्यांच्यावर पोलिस व गुप्तहेरांमार्फत पाळत ठेवली जात असल्याचे वृत्त आहे.
देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी पुरस्कार परत करण्याचे जाहीर करताना बडोदा पोलिसांनी त्यांची भेट घेतली. केंद्र सरकारविरुद्ध या लेखकांनी एखादी मोहीम उघडली आहे काय, अशी विचारणा पोलिसांनी केली. एवढेच नव्हे, तर गुप्तचर विभागातील काही अधिकाऱ्यांनीही देवी यांची चौकशी केली आहे. उत्तर प्रदेशात दादरीमध्ये गोमांस घरात ठेवल्याच्या आरोपानंतर एका इसमाची बेदम मारहाण करून हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातील पुरस्कारप्राप्त लेखक असहिष्णुतेविरुद्ध पेटून उठले.ली दिसत आहे. अर्थातच या लेखकांचा रोख केंद्र सरकारवर आहे. या स्थितीत देवी यांची पोलिसांनी व गुप्तचरांनी केलेली चौकशी हा प्रकार गंभीर मानला जात आहे.