आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पित्याच्या हत्याऱ्याला पकडण्यासाठी ठेवले १५ लाखांचे बक्षीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट - गुजरातच्या उपलेटा येथे १९ वर्षांपूर्वी झालेल्या एका हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात अजूनही पोलिसांना यश आले नाही. एक पोलिस महानिरीक्षक, दोन पोलिस अधीक्षकांसह सात अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास केला आहे, पण काहीच उपयोग झाला नाही. मृत भादाभाई भादाणी यांचा मुलगा दिव्येश ऑस्ट्रेलियात राहतो. वडिलांच्या हत्येबाबत ठोस माहिती देणाऱ्याला १५ लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा त्याने शनिवारी केली.

दिव्येशने गुजरात पोलिसांना अनेक वेळा अर्ज दिला आहे. तो सध्या उपलेटा तालुक्यातील आपल्या पाटणवाव या मूळ गावी आला आहे. त्याने सांगितले की, पोलिस महानिरीक्षक डॉ. डी. आर. पटेल यांनी हत्येच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त केले होते, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आता राजकोटचे पोलिस अधीक्षक अंतरिप सूद हे चौकशी करत आहेत. भादाभाई भादाणी यांची २२ नोव्हेंबर १९९७ रोजी धारदार शस्त्रास्त्रांनी हत्या करण्यात आली होती. दिव्येश २००८ मध्ये ऑस्ट्रेलियाला शिकण्यासाठी गेला होता. आता तो होबार्ट येथेच राहत आहे.
बातम्या आणखी आहेत...