आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bailable Warrant Against Anil Ambani In 5 Gm Gold Coin Case

जास्त किंमत केली वसूल, गुजरातमध्ये अनिल अंबानींच्या विरोधात वॉरंट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - रिलायन्स कॅपिटलचे प्रमुख अनिल अंबानी यांच्याविरोधात ग्राहक न्यायालयाने वॉरंट जारी केले आहे. चार वर्षांपूर्वी रिलायन्स मनीच्या माध्यमातून खरेदी केलेल्या सोन्याच्या नाण्यासाठी कंपनीने जास्त पैसे वसूल केल्याची तक्रार ग्राहकाने केली आहे. गुजरातच्या सुरेंद्रनगर येथील सायलानगरमधील सेतुभाई जडेजा यांनी अंबानींच्या कंपनीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, त्यांनी रिलायन्स मनीच्या माध्यमातून जानेवारी २०११ रोजी पाच ग्रॅम सोन्याचे नाणे खरेदी केले होते. जडेजांनी दावा केला की त्या वेळी २४ कॅरेट सोन्याच्या नाण्याचे बाजारमूल्य १०,३६० रुपये होते; परंतु रिलायन्स मनीने त्यांच्याकडून ११,५०६ रुपये वसूल केले. ग्राहक न्यायालयाने त्यांची तक्रार दाखल करून घेत अंबानींविरोधात जानेवारी रोजी वॉरंट जारी केले आहे. त्यांना २० जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. यासंदर्भात अनिल अंबानी अथवा त्यांच्या कंपनीकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.