बडोदा - लग्न म्हटले की उत्साह, आनंद आणि काही तरी वेगळे करण्याच्या कल्पना. अनेक जणांना
आपले लग्न असे काही व्हावे की पाहणार्यांनी पाहातच राहावे असे वाटते. यासाठी लोक वेगवेगळ्या युक्त्या लढवतात. कोणी पाण्यात लग्न करतो, तर कोणी आकाशात. कोणाची वरात हेलिकॉप्टरने निघते, तर कोणाची पत्रिका एखाद्या जुन्या राजेशाही पत्राप्रमाणे असते. असे नानाविध प्रयोग लग्नात होतात. असाच काहीसा प्रयोग बडोद्यातील एका वकीलाने केला आहे. यश सुर्यावाला नावाच्या या युवकाने त्याच्या लग्नाची पत्रिका नोटराईज्ड एग्रीमेंटप्रमाणे बनवली आहे. यशने या पत्रिकेला स्वतःच्या व्यवसायाचा टच दिला आहे. 28 नोव्हेंबर 2014 ला आयोजित करण्यात आलेल्या या लग्न समारोहाची पत्रिका पहिल्या दृष्टीत तर एखाद्या सरकारी फाईलसारखीच दिसते. याफाईलमध्ये लग्न पत्रिकेची 9 पाने आहेत.
कोणत्याही एग्रिमेंटच्या पहिल्या पानावर जेथे स्टँप पेपरचा वापर केला जातो. तेथे गायकवाडी राजांच्या काळातील स्टॅंपचे ग्राफीक्स वापरण्यात आले आहे. तसेच जेथे स्टँपिंग केली जाते तेथे या तरूणाने कुटुंबाचे नाव लिहिले आहे. पत्रिकेला 'लाडले के
विवाह का दस्तावेज' असे नाव दिले आहे. पत्रिकेचे डिझाईन शहरातील ग्राफीक डिझायनर अर्पित चोकसी आणि जय पांचोली यांनी तयार केले आहे. ही संपूर्ण पत्रिका गुजराती भाषेतील आहे.