आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक मिरवणूकीदरम्यान दोन गटात दंगल, पोलिसांनी केला अश्रूधूराचा वापर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदाः अकोट कामपूर भागात ईदच्या मिरवणूकीदरम्यान धार्मिक झेंड्यांच्या मदतीने लाईन बोर्ड तोडल्यामुळे दोन गटांमध्ये दगडफेक झाली. पाहाता पाहाता परिस्थिती एवढी बिघडली की, लोक रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा फोडायला लागले. गोंधळ घालत असलेल्या जमावाने आसपासच्या सर्व गल्ल्यांमध्ये तोडफोड सुरू केली. या जमावाला पसरवण्यासाठी पोलिसांना लाठीमार, तसेच ८ अश्रूधूरांच्या कांड्याही फोडल्या. या दगडफेकीत PSI आणि दोन महिलांसमवेत ७ लोक गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दोन्ही गटातील 250 ते 300 लोकांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच 37 लोकांची ओळख पटल्याने त्यांना अटक करण्यासाठी पोलिस सक्रीय झाले आहेत.
सविस्तर घटना अशी की, अकोटा येथील रामपूरा वस्तीमध्ये ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने एक आर्मिक जुलूसाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वेगवेगळ्या वाहानांमध्ये लघुमती समाजाचे लोक सहभागी झाले होते. मिरवणूकीतील टेम्पोमध्ये 15 ते 20 लोक बसले होते. या टेम्पोच्या दोन्ही बाजूला बांबूवर धार्मिक झेंडे लावलेले होते. टेम्पोवर लावलेले झेंडे रामपूर वस्तीच्या मुख्य दरवाज्यावर लावण्यात आलेल्या साईनबोर्डला धडकले. ज्यामुळे साईन बोर्ड तुटला. बोर्ड तुटल्याने दोन्ही समाजातील लोक आमोरा समोर आले. हे प्रकरण इतक्या लवकर पेटले की, दोन्ही समाजाच्या लोकांनी दगडफेक करण्यास सुरूवात केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांना अश्रूधूराचा वापर केला.
पुढील स्लाईडवर पाहा, या दंगलीची इतर छायाचित्रे...