आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘बेटी बचाओ’साठी भारूलतांचा ३२ देशांत प्रवास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडोदरा - ४३ वर्षीय अनिवासी भारतीय महिलेने ३२ हजार किलोमीटरचा प्रवास आपल्या कारद्वारे केला. गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील ही महिला असून तिने हा संपूर्ण प्रवास एकटीने केला. ‘कन्या वाचवा, कन्या शिकवा’ या संदेशाच्या प्रचारासाठी आपण ही मोहीम हाती घेतली होती, असे भारूलता कांबळे यांनी सांगितले. नवसारीच्या स्थानिक प्रशासनाचे यात मोलाचे सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले. भारूलता यांनी यशस्विरीत्या ही साहसी मोहीम फत्ते केल्याने स्थानिक प्रशासनाने त्यांचा सत्कार केला.
नवसारीमध्ये दाखल होण्यापूर्वी त्यांनी वडोदऱ्यात मुक्काम केला. येथे मेफेअर अट्रीयम आर्ट गॅलरीत त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. नवसारी हा त्यांच्या प्रवासाचा अंतिम टप्पा होता.

५७ दिवसांत सर्वाधिक देशांना भेट : ५७ दिवस इतक्या कमी अवधीत ३२ देशांना भेट देणाऱ्या आपण पहिल्या महिला आहोत असे त्यांनी सांगितले. मोरेह चेक पाेस्ट या मणिपूरमधील ठिकाणापासून त्यांनी भारतात प्रवेश केला. ८ नोव्हेंबर रोजी त्या भारतात आल्या. ९ पर्वत रांगांतून आपण कार चालवल्याचे त्यांनी सांगितले. तीन प्रमुख वाळवंटांना पार केले. दोन खंडांतून त्यांनी प्रवास केला.
३२ देशांतून ५७ दिवस प्रवास
ब्रिटन ते भारत असा त्यांचा प्रवास होता. या दरम्यान त्यांनी ३२ देशांतून कार चालवत ‘कन्या वाचवा, कन्या शिकवा’ चा संदेश दिला. ३२ देशांतून त्यांनी निधीदेखील संकलित केला. आपले आजाेबा अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांअभावी मरण पावले होते. नवसारी या आपल्या मूळगावी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सज्ज रुग्णालय उभारणार असल्याचे भारूलता यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...