आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhavnagar Seth Brothers Supply Water To Trees Daily

PHOTOS: कोट्यवधींच्या कंपनीचा मालक दररोज झाडांना टाकतो पाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भावनगर (गुजरात)- सध्या अनियमीत पावसाळा दिसतोय. काही भागांमध्ये दमदार पाऊस सुरु आहे तर काही ठिकाणी पावसासाठी तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागत आहे. निसर्गाच्या कामात मानवाने ढवळाढवळ केल्याने ही अनियमीतता दिसून येत असल्याचे जाणवते. यावेळी आठवण होते, ती गर्द हिरव्या झाडांची. भावनगरमधील एक कोट्यधीश व्यापारी दररोज झाडांना पाणी टाकतो. त्यासाठी त्याच्याकडे असलेल्या कारमधून बॅरल भरुन पाणी आणतो.
कायम चुर्ण या कंपनीचे मालक सेठ ब्रदर्स असे या बिझनेसमनचे नाव आहे. सेठ ब्रदर्स दररोज 126 झाडांना पाणी टाकतात. विशेष म्हणजे हे काम ते स्वतः करतात. त्यासाठी कुणाची मदत घेत नाहीत.
सेठ ब्रदर्स कारमध्ये प्रत्येकी 10 लिटरचे 42 बॅरल भरुन आणतात. यासाठी दररोज तीन तास देतात. 2009 पासून सेठ ब्रदर्स हे काम करीत आहेत. त्यांच्या कंपनीचे टर्न ओव्हर सुमारे 80 कोटी रुपये आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, झाडांना पाणी टाकताना सेठ ब्रदर्स...