आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bhopal: Misbehaved With UPSC Student Outside Habibganj Station, Prime Accused Arrested

भोपाळ गँगरेप: हलगर्जीपणामुळे 3 पोलिस निरीक्षक निलंबित, 2 DSP अधिका-यांची हकालपट्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी संध्‍याकाळी कोचिंग क्‍सासहून परतताना विद्यार्थीनीसोबत ही घटना घडली. - Divya Marathi
मंगळवारी संध्‍याकाळी कोचिंग क्‍सासहून परतताना विद्यार्थीनीसोबत ही घटना घडली.
भोपाळ-  मध्‍यप्रदेशची राजधानी भोपाळमध्‍ये झालेल्‍या गँगरप प्रकरणी शुक्रवारी 6 पोलिसांविरोधात कारवाई करण्‍यात आली. तात्‍काळ गँगरेपचा गुन्‍हा दाखल करुन न घेता पीडितेच्‍या कुटुंबाला कित्‍येक तास चकरा मारायला लावल्‍याबद्दल पोलिसांवर ही कारवाई करण्‍यात आली. जीआरपी पोलिस स्‍टेशनसह इतर 3 पोलिस स्टेशनच्‍या निरीक्षकांना याप्रकरणी निलंबित करण्‍यात आले आहे. डीसपी रँकच्‍या दोन अधिका-यांच्‍या हकालपट्टीचेही आदेश देण्‍यात आले आहेत. ठाण्‍यात पीडितेचे कुटुंब तक्रार नोंदवण्‍यासाठी गेले असताना हलगर्जीपणा केल्‍याबद्दल एका एएसआयला याआधीच निलंबित करण्‍यात आले आहे. या प्रकरणाची मुख्‍यमंत्री शिवराज सिंह यांनी गंभीर दखल घेतली असून फास्‍ट ट्रॅक कोर्टमध्‍ये हा खटला चालवणार असल्‍याचे म्‍हटले आहे.

या अधिका-यांवर झाली कारवाई
- सुत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनूसार, गुन्‍हा दाखल करुन घेण्‍यामध्‍ये उशीर केल्‍याबद्दल हबीबगंजचे पोलिस निरीक्षक रविंद यादव, एमपीनगरचे पोलिस निरीक्षक संजय सिंह आणि जीआरपी पोलिस स्‍टेशनचे निरीक्षक मोहित सक्‍सेना यांना निलंबित करण्‍यात आले आहे.  
 
काय आहे प्रकरण?
भोपाळमध्‍ये कोचिंग क्‍लासहून परतणा-या 19 वर्षीय विद्यार्थीनीसोबत 31 ऑक्‍टोबररोजी  गँगरेप झाला होता. संध्‍याकाळी 7.30च्‍या सुमारास ही घटना घडली. 4 नराधमांनी तब्‍बल 3 तास मुलीवर अत्‍याचार केला. मात्र जवळच असलेल्‍या पोलिस स्‍टेशनला याचा सुगावाही लागली नाही. शेवटी कसेबसे पीडित तरुणी रात्री 10 वाजता आरपीएफ ठाण्‍यामध्ये पोहोचली. तरीही रेल्‍वे पोलिसांनी काहीही केले नाही. बुधवारी सकाळी पिडीता आणि तिचे आई-वडील एमपीनगर पोलिस स्‍टेशनमध्‍ये गेले. मात्र तेथेही तक्रार नोंदवून घेण्‍यास पोलिसांनी नकार दिला. तक्रार नोंदवण्‍यासाठी पालक आरपीएफ, एमपी नगर पोलिस स्‍टेशनदरम्‍यान चकरा मारत राहिले. अखेर मोठ्या मुश्किलीनंतर हबीबगंज पोलिस स्‍टेशनमध्‍ये पीडितेची तक्रार नोदंवून घेण्‍यात आली. तोपर्यंत घटना घडून 24 तास उलटून गेले होते.    

पालकांनी पकडले आरोपीला
- एमपीनगरहून हबीबगंज ठाण्‍यात जात असताना पीडितेचे कुटुंब काही वेळ एका कॉम्‍प्लेक्‍स जवळ थांबले होते.
- तेवढ्यात तेथे एका झोपडीत राहणा-या गोलू नावाच्‍या आरोपीवर पिडीतेची नजर गेली. तिने तेव्‍हाच ओरडून ही बाब आपल्‍या वडीलांना सांगितली. त्‍यांनतर आई-वडीलांनी मिळून आरोपीला पकडले व त्‍याला हबीबगंज पोलिस स्‍टेशनमधे नेले. पोलिसांना सर्व माहिती सांगितल्‍यावर पोलिसांनी आरोपीची चौकशी सुरु केली. त्‍यानंतर काही वेळातच पोलिसांनी दुस-या आरोपीला पकडून आणले. त्‍याच्‍याकडून पिडीतेचा मोबाईल आणि कानाचे झुमके मिळाले.
- त्‍यानंतर अधिक तपासाठी हबीबगंज पोलिस स्‍टेशनचे अधिकारी घटनास्‍थळी गेले. जीआरपी पोलिसांनाही त्‍यांनी बोलावून घेतले.
 
अंकल, वडीलांशी बोलणे करुन द्या- पीडिता
- गँगरेपनंतर काही वेळ पीडित तरुणी बेशुद्ध होती. शुद्धीत आल्‍यावर घटनास्‍थळापासून 100 मीटर अंतरावर असलेल्‍या आरपीएफ पोलिस स्‍टेशनमध्‍ये ती कशीबशी पोहोचली. येथील कर्मचारी तिला ओळखत होते.
- तरुणी त्‍यांना म्‍हणाली, 'अंकल, माझे वडीलांशी बोलणे करुन द्या. कर्मचा-यांनी तिच्‍या वडीलांना फोन लावला व तिचे बोलणे करुन दिले. नंतर पीडितेने रडत रडत सर्व हकि‍गत आधी वडीलांना व नंतर आपल्‍या आईला सांगितली.'
- जवळपास 15 मिनीटांनी पी‍डितेचे वडील पोलिस स्‍टेशनमध्‍ये आले आणि तिला घरी घेऊन गेले.
 
पोलिसांची असंवेदनशिलता, कुटुंबाला मारायला लावल्‍या चकरा
- घटनेनंतर पोलिसांच्‍या असंवेदनशीलतेचा चेहराही समोर आला आहे. पोलिस स्‍टेशनमध्‍ये तक्रार देण्‍यासाठी गेलेल्‍या पिडीतेच्‍या कुटुंबाला पोलिसांनी वेगवेगळ्या स्‍टेशनच्‍या चकरा मारायला लावल्‍या.
- प्रथम भोपाळ पोलिस स्‍टेशनमध्‍ये गेलेल्‍या या कुटुंबाला तेथील पोलिसांनी हे प्रकरण आमच्‍या हद्दीत येत नाही म्‍हणत तेथून जायला सांगितले. यांनतर हे कुटुंब जवळभर तासभर एमपी नगर पोलिस स्‍टेशन आणि हबीबगंज पोलिस स्‍टेशनच्‍या चकरा मारत होते. यानंतर त्‍यांना सांगण्‍यात आले की, हे प्रकरण जीआरपी स्‍टेशन अंतर्गत येते. अखेर जीआरपी स्‍टेशनमध्‍ये पिडीतेची वैद्कीय तपासणी करुन आरोपींविरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. वैद्कीय तपासणीमध्‍ये पिडीतेवर बलात्‍कार झाला असल्‍याचे सिद्ध झाले.

आरोपीने सांगितली बाकी साथीदारांची नावे
- हबीबगंज पोलिसांनी आपल्‍या खाक्‍या दाखवताच पीडितेच्‍या पालकांनी पकडलेल्‍या गोलू नावाच्‍या आरोपीने इतर तीन आरोपींची नावे पोलिसांनी सांगितली. याआधारावर पोलिसांनी अमर, राजेश व रमेश या अरोपींनाही नंतर अटक केली.  
 
केवळ एक ASI निलंबित
- गुन्‍हा दाखल करुन घेण्‍यास हलगर्जीपणा केल्‍याबद्दल एमपीनगर पोलिस स्‍टेशनच्‍या ASIला निलंबित करण्‍यात आले आहे.
- बुधवारी सकाळी 11 वाजता पिडीतेचे कुटुंब या स्‍टेशनमध्‍ये आले होते तेव्‍हा त्‍यांची भेट ASI आर.एन. टेकाम यांच्‍याशी झाली होती.
- ASI आर.एन. टेकाम यांनी कुटुंबाला हे प्रकरण हबीबगंज पोलिसस्‍टेशनच्‍या हद्दीत येत असल्‍याचे सांगून त्‍यांना तेथे जाण्‍यास सांगितले. मात्र कायद्यानुसार त्‍यांना आपल्‍या स्‍टेशनमध्‍येही गुन्‍हा दाखल करता आला असता. नंतर ती केस डायरी ते हबीबगंज पोलिस स्टेशनला देऊ शकले असते.
- डीआयजी संतोष कुमार सिंह यांनी या घटनेची गंभीर दखल घेत कर्तव्‍यात कसूर केल्‍याबद्दल ASI आर.एन. टेकाम यांना निलंबित केले आहे.
 
दोषींना सोडणार नाही- मुख्‍यमंत्री शिवराज सिंह चौहान
- मुख्‍यमंत्री शिवरजा सिंह चौहान यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून हा खटला फास्‍ट ट्रॅक कोर्टात चालवणार असल्‍याचे सांगितले आहे.
- मुख्‍यमंत्र्यांनी सांगितले की, '4 आरोपींना पकडण्‍यात आले आहे. दोषींना निश्चित शिक्षा दिली जाईल. कर्तव्‍यात कसूर करणा-या एका पोलिस अधिका-यालाही निलंबित करण्‍यात आले आहे. जे जे दोषी आढळतील त्‍यांच्‍याविरोधात कारवाई केली जाईल.'

तिची हत्‍या करणार होते आरोपी
- पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनूसार, पिडीता भोपाळमधील एमपीनगर परिसरातील कोचिंग क्‍लासमध्‍ये युपीएससीची तयारी करत आहे. 31 ऑक्‍टोबररोजी संध्‍याकाळी 7.30 वाजता ती कोचिंग क्‍लास संपवून घरी येत होती. तेव्‍हाच रेल्वे स्‍टेशनजवळ 4 मुलांनी तिला घेरले. प्रथम त्‍यांनी तिच्‍याशी छेडछाड केली. नंतर तिला धमकावून झुडुपांमध्‍ये नेत नराधमांनी तिच्‍यावर गँगरेप केला.
- गँगरेपनंतर आरोपींना पिडीतेची हत्‍या करायची होती, मात्र कसेतरी करुन तिने तेथून पळ काढला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
 
 
 
 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...