अंबाजी- उत्तर गुजरातमध्ये असलेल्या अंबाजी शक्तिपीठ देवस्थानात विशालकाय अगरबत्ती प्रज्वलित करण्यात आली. आता ती तब्बल 12 दिवस धुमसत राहणार आहे. यात पाच प्रकारच्या सुगंधांचा वापर करण्यात आला आहे. ही 61 फुट लांब असून 3.5 फुट रुंद आहे. या अगरबत्तीचे वजन तब्बल 2 टन आहे. यात 550 किलो चारकोल आणि 325 वेळूंचा वापर करण्यात आला आहे. 30 कामगारांनी दिवसरात्र काम करीत 240 तासांत या अगरबत्तीची निर्मिती केली आहे. गुजरातचे गृहराज्यमंत्री रजनीकांत पटेल यांनी शनिवारी सायंकाळी या अगरबत्तीला प्रज्वलित केले. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी या अगरबत्तीची माहिती देण्यात आली आहे. सध्या गिनिज बुकमध्ये 51 फुट लांब अगरबत्तीची नोंद आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या महाकाय अगरबत्तीचे फोटो... आणि इतर माहिती.... जाणून घ्या अगरबत्ती आहे आरोग्यासाठी हानीकारक....