आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत महाराष्ट्रापाठाेपाठ गुजरातेतही भाजपला यश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गांधीनगर - महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातेतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीत भाजपने १२३ पैकी १०७ जागा जिंकून मोठे यश िमळवले. तर या निवडणुकीत माेठा पराभव स्वीकारावा लागलेल्या काँग्रेसला अवघ्या १६ जागांवर समाधान मानावे लागले. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी हा पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वाचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली अाहे. ‘सर्जिकल स्ट्राइक व माेठ्या नाेटाबंदीबाबत माेदींनी घेतलेल्या निर्णयाला जनतेचे समर्थनच असल्याचे यातून सिद्ध हाेते,’ अशी पुष्टीही रूपानी यांनी जाेडली.

दक्षिण गुजरातमधील वापी (वलसाड), कनकपूर-कनसाड (सुरत) नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या १७ जागा भाजपने खेचून आणल्या. तसेच अन्य एका पंचायत समितीवरही भाजपने झेंडा फडकावला. कनकपूर-कनसाड नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने क्लीन स्वीप करत २८ पैकी २७ जागा मिळवल्या. काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली. वापी नगरपालिकेत एकूण ४४ जागांपैकी ४१ जागांवर भाजप उमेदवार विजयी झाले. काँग्रेसला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. याशिवाय राज्यात पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या २९ जागांसाठी पोटनिवडणूक झाली. यापैकी नगरपालिकेच्या १६ पैकी १४ जागा भाजपने पटकावल्या. तर जिल्हा परिषदेच्या पाेटनिवडणुकीत चार जागांपैकी प्रत्येकी दाेन जागा काँग्रेस व भाजपला मिळाल्या अाहेत.
बातम्या आणखी आहेत...