आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BJP नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य, राहुल गांधींना बाबर भक्त आणि खिलजीचा नातेवाईक म्हटले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी अयोध्या वाद सुरू असतानाच राहुल गांधींबाबत एक वादग्रस्त ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी राहुल गांधींना बाबर भक्त आणि खिलजीचा नातेवाईक म्हटले आहे. त्यांच्या या ट्वीटने एकच गदारोळ उडाला आहे. 


राव यांनी काय लिहिले ट्वीटमध्ये.. 
राल यांनी लिहिले, अयोध्येत राम मंदिराचा विरोध करण्यासाठी राहुल गांधींनी ओवैसी, जिलानी यांच्याशी हातमिळवणी केली. राहुल गांधी निश्चितपणे 'बाबर भक्त' आणि 'खिलजीचे नातेवाईक' आहेत. बाबराने राम मंदिर नष्ट केले आणि खिलजीने सोमनाथ लुटले. नेहरूंचे वारस या दोन्ही मुस्लीम हल्लेखोरांच्या बाजुने आहेत. 


औरंगजेब राज्याबाबत काय म्हणाले होते मोदी.. 
मोदींनी सोमवारी रॅलीमध्ये काँग्रेस अध्यक्षपदासाठीच्या निवडणुक प्रक्रियेबाबत टीका केली होती. त्यांनी मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्याचा हवाला देत काँग्रेसमध्ये औरंगजेबाचे राज्य असल्याचे म्हटले होते. 
- काँग्रेसने आधी धर्मनिरपेक्षतेचा मार्ग निवडला पण आता या निवडणुकीत ते कुठे कुठे जात आहेत, हे सर्वांनी पाहिले आहे. दुर्दैवाने मुस्लिमांना त्यांचे सत्य कळून चुकले आहे, असेही मोदी म्हणाले. 
- भावनगरमध्ये बोलताना मोदी म्हणाले होते, मला कळत नाही की काँग्रेस तेच ते का करत आहे. जाती-धर्माच्या नावावर लोकांमध्ये मतभेद निर्माण करण्याचे काम सुरू आहे. फोडा आणि राज्य करा हे काँग्रेसने इंग्रजांकडून शिकले आहे. गुजरात शांती, एकता आणि सद्भभावनेच्या जोरावर पुढे सरकत आहे. 


सुप्रीम कोर्टात काय म्हणाले सिब्बल.. 
सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील असलेले कपिल सिब्बल म्हणाले की, या प्रकरणाची सुनावणी जेव्हा केव्हा होईल, तेव्हा याचे तीव्र पडसाद कोर्टाबाहेर उमटतील. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी माझी कोर्टाला विनंती आहे की, या प्रकरणावर जुलै 2019 (सार्वत्रिक निवडणुका) नंतर सुनावणी व्हावी. या खटल्यावर अलहाबाद हायकोर्टाच्या निर्णयानंतर 7 वर्षांनी सुनावणी होत आहे. 

 

पुढे पाहा, राव यांनी केलेले ट्वीट...

बातम्या आणखी आहेत...