आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Leader Keshubhai Patel And Neradra Modi News In Marathi

आनंदीबेन पटेल यांच्या शपथविधी सोहळ्यात 'बडे भाई-छोटे भाई' एकत्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गांधीनगर- गुजरातच्या महसूलमंत्री आनंदीबेन पटेल यांना गुरुवारी गुजरातच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून बहुमान प्राप्त झाला. राज्यपाल कमला बेनीवाल यांनी त्यांना शपथ दिली. या प्रसंगी नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह पक्षातील अनेक मान्यवर उपस्थित होते. मोदी यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचीही उपस्थिती होती.

ज्येष्ठ नेते केशुभार्इं पटेल यांना मोदींनी आधार देत समारंभस्थळी आणले. अडवाणी यांनीही त्यांची गळाभेट घेतली. आनंदीबेन यांची बुधवारी विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली होती. 73 वर्षीय आनंदीबेन मोदी यांच्या अनुपस्थितीत सरकार चालवत होत्या. 1994 मध्ये त्यांची राज्यसभा सदस्यत्त्वासाठी निवड झाली. आनंदीबेन यांनी केशुभाई पटेल यांच्या मंत्रिमंडळातही काम केले आहे.

‘पाहिंद विधी’तही विक्रम
अहमदाबादच्या जगन्नाथ रथयात्रेमध्ये यावर्षी नवा विक्रम प्रस्थापित होईल. ‘पाहिंद विधी’ची संधी पहिल्यांदाच महिलेला मिळणार आहे. आनंदीबेन यांना मुख्यमंत्री म्हणून हा बहुमान मिळणार आहे. सोन्याच्या विशेष झाडूने रथयात्रेचा रस्ता साफ करण्याला ‘पाहिंद विधी’ म्हटले जाते. या विधीनंतर आम जनतेला दर्शन देत भगवान जगन्नाथ मंदिरात पोहोचतात. या वर्षी 30 जून रोजी रथयात्रा निघेल.