आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp Leader Lalkrishna Advani Missing Posters In Gandhinagar, News In Marathi

\'भाजपचे खासदार लालकृष्ण अडवाणी बेपत्ता\', गुजरातमध्ये झळकले पोस्टर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गांधीनगरचे खासदार लालकृष्ण अडवाणी बेपत्ता असल्याचे पोस्टर समोर आले आहेत. अडवाणींचा मतदार संघ असलेल्या गांधीनगरात 'खासदार लालकृष्ण अडवाणी बेपत्ता आहेत' असे पोस्टर्स झळकले आहेत. यापूर्वी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत अशाच प्रकारचे पोस्टर सोशल मीडियात शेअर झाले होते.
गांधीनगरमध्ये झळकलेले सर्व पोस्टर्स हिंदीत आहेत. 'खासदार लालकृष्ण अडवाणी अनेक वर्षांपासून बेपत्ता आहे. ते या शहराचे खासदार आहेत. परंतु आम्ही त्यांना पाहिलेले नाही. आम्हाला त्यांची भेट घ्यायची आहे. शहरातील विविध समस्याविषयी चर्चा करायची आहे. अडवाणी कोणाला गांधीनगरमध्ये दिसले तर आमच्याशी संपर्क साधावा,'- आप-गांधीनगर, असा मजकूल पोस्टरमध्ये आहे.
दरम्यान, अडवाणी बेपत्ता असल्याचे पोस्टर्स आम्ही लावले नसल्याचे आम आदमी पक्षाने (आप) म्हटले आहे. या प्रकाराविषयीची माहिती प्रसारमाध्यमातून मिळाली. आपच्या पक्षाचे कार्यकर्ता असा प्रकार करणार नाहीत. आमची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांचा हा प्रताप दिसतो, असे 'आप'चे गुजरातचे संयोजक सुखदेव पटेल यांनी म्हटले आहे.