आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

BJP नेता चालवत होता हायप्रोफाईल सेक्स रॅकेट, फार्म हाऊसवर पोलिसांनी मारला छापा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजप नेते संदीप आरेकर यांच्या फार्म हाऊसमध्ये सापडलेल्या तरुणी. - Divya Marathi
भाजप नेते संदीप आरेकर यांच्या फार्म हाऊसमध्ये सापडलेल्या तरुणी.
उमरगाम (गुजरात)- भाजप नेते संदीप आरेकर यांच्या सरीगाम जाआयडीसी फार्म हाऊसवर काल रात्री पोलिसांनी छापा टाकला. या ठिकाणी हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी फार्म हाऊसमधून तीन तरुणींसह एका दलाला अटक केली.
बऱ्याच दिवसांपासून सुरु होता हा धंदा
संदीप आरेकर यांच्या फार्म हाऊसमध्ये अनेक महिन्यांपासून सेक्स रॅकेट चालवले जात होते असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांना पक्की माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी छापा टाकण्यात आला. आरेकर यांचे बड्या राजकीय नेत्यांसोबत संबंध आहेत. त्यामुळे लगेच छापा टाकणे पोलिसांनाही शक्य नव्हते. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी हे पाऊल उचलले.
गुजरातमध्ये सेक्स रॅकेट्सचा सुळसुळाट
गुजरातच्या काही शहरांमध्ये सेक्स रॅकेट्सचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाल्याचे सांगितले जाते. गुजरातमध्ये बहुतांश बिझनेस करणारे लोक आहेत. बऱ्याच वेळा त्यांना बिझनेससाठी घराबाहेर राहावे लागले. तसेच्या त्यांच्याजवळ पैसेही भरपूर असतात. अशा वेळी ते शारीरिक मोहाला बळी पडतात.
पुढील स्लाईडवर बघा, आरेकर यांच्या फार्महाऊसमधून अटक करण्यात आलेल्या तरुणी.... हे आहेत संदीप आरेकर....
बातम्या आणखी आहेत...