आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP MLA Kantilal Amrutiya Caught On Camera Thrashing Drunk Youth

भाजप आमदाराच्या व्हिडिओवरून वादंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - भारतीय जनता पक्षाचे आमदार कांतीलाल अमृतीया यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यात कांतीलाल व त्यांचा अंगरक्षक एका तरुणाला मारहाण करत असल्याचे दिसत आहे.

हा तरुण मद्यधुंद अवस्थेत तलवार घेऊन वावरत होता असे, पोलिस सूत्रांनी सांगितले. अमृतीया हे गुजरातच्या मोरबी मतदारसंघातील आमदार आहेत. काठीने ते एका युवकाला मारझोड करत असल्याचा व्हिडिओ व्हॉट्स अ‍ॅप व सोशल नेटवर्कवर अपलोड करण्यात आला आहे. जगदीश लोकहील असे या युवकाचे नाव असून त्यानेच तलवारीने वार केल्याचे, पोलिस सूत्रांनी सांगितले. ही घटना मोरबीजवळील उमा वसाहतीत घडली.

अमृतीया यांनी पोलिसांना बोलावून त्या युवकाला त्यांच्या स्वाधीन केले. कायदा हातात घेतल्याबद्दल अमृतीयांवर टीका होत आहे. मात्र त्या मद्यधुंद तरुणाकडे शस्त्र होते, स्थानिक नागरिकांच्या संरक्षणासाठी तेथे कोणीच नव्हते, असे स्पष्टीकरण आमदारांनी दिले.