आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP National President\'s Son Jai Shah Marriage Effected From Delhi Election Results

घोडी - बँड शिवाय लागले अमित शहांच्या मुलाचे लग्न, विवाहस्थळीच केले निकालावर मंथन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा मंगळवारी विवाह बंधनात अडकला. या सोहळ्यावर दिल्ली निवडणुकीच्या पराभवाचे सावट पसरले होते. जय घोडीवर स्वार होऊन मिरवणुकीने येण्याचे ठरले होते, मात्र ऐनवेळी या मिरवणुकीला फाटा देण्यात आला. एवढेच नाही तर, बँड पथकाला परत पाठविण्यात आले. दिल्लीतील पराभवाच्या बातमीने अमित शहा आणि भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी लग्नसोहळ्याच्या स्थळीच तातडीची बैठक घेतली. यात दिल्लीत पत्रकार परिषद करायची की नाही, शहांनी केजरीवालांचे फोन करुन अभिनंदन करायचे का, या मुद्यांवर चर्चा झाली.
अहमदाबादमधील वायएमसीए क्लब येथे हा विवाह सोहळा झाला. लग्न मंडपाच्या जवळच असलेल्या व्हीआयपी रुममध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, पीयूष गोयल आणि राजीव प्रताप रुडी यांच्यासह काही महत्त्वाचे नेते बैठकीला हजर होते. सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीतील मुद्यांवर पंतप्रधान मोदींचा सल्ला घेण्याचे ठरले.
जयचे आज त्याची कॉलेजमधील मैत्रिण ऋषितासोबत शुभमंगल झाले. या आनंद सोहळ्यावर दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाचा थेट परिणाम जाणवत होता.

अमित शहांचा मुलगा जयच्या लग्नाचे INSIDE PHOTOS
पुढील स्लाइडमध्ये पाहा, अमित शहा यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याची खास छायाचित्रे