आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP President Has Not Lost Any Election In Two Decades News In Marathi

अमित शहांचे अहमदाबादेतून दिल्‍लीवर लक्ष; चिरंजीव जय शहांचा मंगळवारी विवाह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- भाजपचे राष्‍ट्रीय अध्यक्ष अमित शहा सध्या अहमदाबादेत आहेत. अम‍ित शहा यांच्यासाठी मंगळवारचा (10 फ्रेबुवारी) दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे. मंगळवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीची निकाल घोषित होणार असून याच दिवशी अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा यांचा अहमदाबादेत विवाह आहे. त्यामुळे अमित शहा यांना अहमदाबादेतून दिल्लीवर लक्ष असणार आहे.
अहमदाबाद येथील वायएमसीए क्‍लबमध्ये जय यांचा विवाह होणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी दिल्‍ली विधानसभा निवडणुकीचा निकाल घोषित होणार आहे. त्यात बहुतांश एक्झिट पोलनी 'भाजपसाठी अजून दिल्ली दूर' असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

अमित शहा यांनी गेल्या शनिवारी सायंकाळी दिल्‍लीत मतदान झाल्यानंतर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यानंतर अमित शहा लागलीच अहमदाबादकडे रवाना झाले होते.
10 फेब्रुवारीला विवाह आणि 12 फेब्रुवारीला रिसेप्‍शन
अमित शहा यांच्या मुलाच्या विवाहाला तीन हजारांहुन जास्त पाहुणे उपस्थिती देणार आहेत. दोन्ही कार्यक्रम पार पाडण्याची जबाबदारी अमित शहा यांचे मित्र परिवाराने घेतली आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहाणार की नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, गृहमंत्री राजनाथ सिंह, धर्मेंद प्रधान आदी नेते अहमदाबादला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. 10 तारखेला अहमदाबादमधील अनेक हॉटेल्समध्ये शेकडो खोल्या बुक करण्यात आला आहे.

तसेच अमित शहा यांनी 15 फेब्रुवारीला दिल्‍लीत रिसेप्‍शन पार्टीचे आयोजन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पुढील स्लाइड्‍सवर पाहा, जय आणि रिशिताच्या साखरपुड्याची छायाचित्रे...