आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात : भाजपने जारी केले \'संकल्प पत्र\', काँग्रेस सामाजिक ध्रुवीकरण करत असल्याचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही तास उरले असताना भाजपने ज्यांचा जाहिरनामा म्हणजेच 'संकल्प पत्र' सादर केले आहे. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले, की गुजरात हे उत्पादनाच्या बाबतील देशातील सर्वाधिक विकासदर असलेले राज्य आहे. काँग्रेसचा जाहीरनामा हा घटनात्मक आणि आर्थिक दृष्ट्यादेखील अशक्य आश्वासनांचा भरणा असल्याची टीकाही यावेळी जेटली यांनी केली. 


काय म्हणाले जेटली..
- काँग्रेस सत्ता मिळवण्यासाठी राज्यातील जनतेला खोटी आश्वासने देत आहे. 
- राज्याला विकासाच्या दिशेने पुढे नेण्यासाठी एकता राहावी हा भाजपचा मूळ उद्देश आहे. 
- काँग्रेसने समाजांमध्ये दुफळी माजवून कितीही सामाजिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा त्यांना तोटाच होईल. 

 

 

बातम्या आणखी आहेत...