आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळ्या पैशाची चौकशी वेगाने करणार : न्या.शहा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- काळ्या पैशाच्या प्रकरणात बरीच गुंतागुंत आहे. मात्र आपण याची वेगात चौकशी करू, असे आश्वासन या विषयावर नेमलेल्या एसआयटीचे प्रमुख, सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती एम. बी. शहा यांनी दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी न्या. शहा यांच्या अध्यक्षतेखाली काळ्या पैशाची पाळेमुळे उघड करण्यासाठी एसआयटी स्थापन केली. या प्रकरणात बरीच गुंतागुंत असू शकेल. मात्र, या क्षणी कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागेल हे सांगता येणार नाही. या समस्या लवकरच सोडविण्याचा प्रयत्न करेन, असे शहा यांनी सांगितले. याआधी ओडिशा आणि गोव्यातील अवैध खाणकामाच्या चौकशी आयोगाचा मी अध्यक्ष होतो. यामध्ये पहिल्या दोन महिन्यांत अंतरिम अहवाल सादर केला होता. नंतर सहा महिन्यांनी गोव्याचा अहवाल सादर केला. त्यामुळे नवे काम लवकर पूर्ण होईल असा मला विश्वास आहे, असे शहा म्हणाले.