आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Amitabh Bachchan And Dhanush Is In Ahemadabad On Makar Sankranti

अमिताभ बच्चन यांना अहमदाबादमध्ये उडवला पतंग; मांज्याने कापले बोट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनी बुधवारी गुजरातमध्ये मकर संक्रांत सण साजरा केला. अभिताभ यांनी शहरातील नाराणपुर्‍यातील एका हाऊसिंग सोसायटीमध्ये पतंग उडवण्याचा मनमुरात आनंद लुटला. अभिनेता धनुष आणि अभिनेत्री अक्षरा हसन यावेळी उपस्थित होते. मात्र, पतंग उडवताना मांज्याने अभिताभ यांचे बोट कापले गेले. अमिताभ यांनी जखमेवर बँडेड लावले.
अमिताभ यांचा 'शमिताभ' हा सिनेमा लवकचर प्रदर्शित होत आहे. 'शमिताभ'च्या प्रमोशनसाठी अमिताभ बच्चन यांच्यासह संपूर्ण स्टार कास्ट बुधवारी अहमदाबादेत पोहोचले आहेत. अमिताभसह संपूर्ण स्टार कास्टने पतंग उडवून धम्माल मजा केली. अमिताभ यांना पाहाण्यासाठी हाउसिंग सोसायटीमध्ये लोकांनी गर्दी केली होती. तसेच सोसायटी शेजारील रस्त्यावरील वाहतूक देखील ठप्प झाली होती.

6 फेब्रुवारीला प्रदर्शित होईल 'शमिताभ'
अमिताभ बच्चन हे गुजरात राज्याचे ब्रॅड अॅम्बेसडर आहे. अमिताभ आपला आगामी सिनेमा 'शमिताभ'च्या प्रमोशनसाठी अनेक शहरांचा दौरा करणार आहे. अहमदाबादनंतर दिल्ली, चेन्नई, दुबई, लंडनसह देश-विदेशातील अनेक शहरात जाणार असल्याचे अमिताभ यांनी आपल्या 'ब्लॉग'वर लिहिले आहे. 'शमिताभ' हा सिनेमा येत्या 6 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, अमिताभ बच्चन यांचे पतंग उडवताना फोटो...