वलसाड (गुजरात)- डुमस बिचवर असलेल्या एका हॉटेलच्या खोलीत प्रियकराने प्रेयसीचा गळा आवळून ठार मारले. मृतदेह नष्ट करण्यासाठी खोलीच्या बाथरुममध्ये त्याला आग लावली. त्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले. प्रेयसीचे आणखी एक युवकासोबत संबंध असल्याच्या संशयावरुन प्रियकराने हत्या केल्याची माहिती समोर येत आहे.
मंगळवारी रात्री हॉटेलमधील खोली केली होती बुक
या प्रियकराचे नाव शिवकिरण शाशन (32) तर प्रेयसीचे नाव भावना मौर्य (26) असे आहे. शिवकिरण कॉम्प्युटर क्लास घेतो. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने सांगितले, की मंगळवारी रात्री आम्ही रविराज हॉटेलमध्ये खोली बुक केली होती. मला अखेरचे भेटायचे आहे असे सांगून भावनाला हॉटेलवर बोलवले होते. दोघे रात्रभर सोबत होते. बुधवारी सकाळी संधी मिळताच त्याने भावनाचा गळा आवळून खुन केला. त्यानंतर दुपारी मृतदेह नष्ट करण्यासाठी हॉटेलच्या बाथरुममध्ये त्याला आग लावली. तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण हॉटेलच्या खोलीतून धूर निघत असल्याचे कर्मचाऱ्यांनी बघितले होते. त्यांनी खोलीचे दार तोडले. बाथरुममध्ये बघितले तर भावनाचा अर्धा जळलेला मृतदेह पडला होता. त्यांनी लगेच शिवकिरणला पकडले.
शिवकिरणला भावनाच्या चारित्र्यावर होता संशय
गेल्या अनेक वर्षांपासून शिवकिरण आणि भावना यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघे लग्नही करणार होते. पण भावनाचे कुटुंब याला राजी नव्हते. त्यानंतर भावनाने लग्नाला नकार दिला होता. तिला कुटुंबाच्या सहमतीने लग्न करायचे होते. या दरम्यान त्याचा संशय बळावला, की भावनाचे एका दुसऱ्या तरुणाशी संबंध आहे. त्यामुळे तो चिडला होता. त्याने भावनाला ठार मारण्याचा निर्णय घेतला होता.
भावनाने कुटुंबीयांना काहीच सांगितले नव्हते
भावनाच्या कुटुंबीयांना या अफेअरची माहिती होती. पण त्यांनी लग्नाला स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. त्यानंतर तिने घरी सांगितले होते, की शिवकिरण याच्याशी असलेले नाते तिने तोडले आहे. वलसाडच्या मोगरावाडी झोनमधील शांतीकुंज अपार्टमेंट राहणारी भावना कॉम्युटर इंजिनिअर आहे. ती एका खासगी कंपनीत जॉब करते.
कुटुंबाला रात्री उशीरा समजले ती जिवंत नाही
भावना ही शिवकिरणसोबत एका हॉटेलमध्ये आहे याची तिच्या कुटुंबाला जराही कल्पना नव्हती. ऑफिसचे काम आहे, असे सांगून ती बाहेर पडली होती. पोलिसांनी घटनेची माहिती दिली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेशी संबंधित फोटो.....