आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bride Ran Away From Wedding Pavilion Groom Cry A Lot In Varanasi

PHOTOS : लग्‍नमंडपातून नवरी \'रफूचक्‍कर\' हमसून-हमसून रडला नवरदेव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी(उत्‍तर प्रदेश) - सारनाथ परिसरात एक चांगली विनोदी बातमी घडली. लग्‍नमंडपातून नवरीने चक्‍क पळ काढला. नवरी पळून गेल्‍याचे कळताच नवरा मुलगा हमसून- हमसून रडत होता.
अलाहाबादच्‍या देवनगरमधील नवरदेव अरविंद सिंहची वरात सारनाथ येथे आली होती. लग्‍नाचे संपूर्ण सोपस्‍कार पूर्ण झाले होते. रात्री उशिरा लग्‍न लागल्‍याने वरात सारनाथलाच मुक्‍कामी थांबली. दुस-या दिवशी सकाळी नवरीच दिसेना. शोधाशोध घेतल्‍यांनतर नवरी रात्रीच पळून गेल्‍याचे निष्‍पन्‍न झाले. नवरी हरवल्‍याची तक्रार पोलिसांत दिल्‍या गेली. पोलिसांनीही शोधाशोध सुरु केली. हे वृत्‍त नव-या मुलाला कळताच तो हमसून -हमसून रडत होता.
लग्‍नापूर्वीच झाला वाद
सारखपुडा झाल्‍यानंतर नवरा मुलगा नवरी नववधूसोबत मद्य पिऊन बोलला होता. त्‍यामुळे दोघांमध्‍ये चांगलाच वाद झाला होता. त्‍यामुळेच नवरीने पळ काढला असावा असे नवरदेवाचा भाऊ अजित म्‍हणाला.
'मी दारु पीत नाही'- रडत-रडत उद्गारला नवरदेव
नवरी पळून गेल्‍यानंतर नवरदेव खूपच भाऊक झाला होता. ताे हमसून हमसून रडत होता. रडतच तो दारु पीत नसल्‍याचेही बोलत होता. पोलिस त्‍याची चौकशी करत असताना तो आणखीच रडत होता.
पुढील स्‍लाइडवर पाहा, काय म्‍हणाले नातेवाईक.. नातेवाईकात झाली हमरी-तुमरी..