आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bus Conductor Misbehave With Girl In Rajkot Gujarat

VIDEO: तरुणीशी गैरवर्तवणूक करणाऱ्या कंडक्टरला कुटुंबीयांनी दिला चोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट (गुजरात)- बसला ओव्हरटेक केल्याने चिडलेल्या कंडक्टरने दुचाकीस्वार तरुणीला अश्लिल हावभाव दाखविले. त्यानंतर तरुणीने बस थांबवून कुटुंबीयांना बोलवून घेतले. बस कंडक्टरला जाब विचारला. यावेळी झालेल्या शाब्दिक चकमकीचे रुपांतर मारहाणीत झाले. तरुणीच्या कुटुंबीयांना बस कंडक्टरला चोप दिला. अखेर त्याने माफी मागितली.
राजकोट शहरातील याज्ञिक रोडवरील रामकृष्ण आश्रमाजवळ हा प्रकार घडला. 50 क्रमांकाची सीटी बस सौराष्ट्र विद्यापिठाकडे जात होती. यावेळी तरुणीने साईड कापून बसला ओव्हरटेक केले. त्यावर चिडलेल्या कंडक्टरने शिविगाळ करीत अश्लिल हावभाव दाखविले. त्यानंतर तरुणीने बससमोर दुचाकी लावली. बस रोखून धरली. कुटुंबीयांना बोलविले. या घटनेचा कंडक्टरला जाब विचारला. तरुणीच्या कुटुंबीयांनी कंडक्टरला चोप दिला.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या घटनेशी संबंधित फोटो.....