आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसचालकाची पत्नी म्हणाली..कितीही हल्ले होऊ द्या तरीही पतीला अमरनाथ यात्रेला पाठवेल!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वलसाड/सुरत- काश्मीरमधील अनंतबाग येथे अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जिगरबाज बसचालक सलीम शेख याने 51 प्रवाशांचे प्राण वाचवले. सलीम शेखचे देशभरात कौतुक होत आहे. सलीमच्या गुजरातमधील कुटुंबीयांनीही प्रसार माध्यमांशी बाेलताना त्याने केलेल्या कामाचे ताेंडभरून काैतूक केले अाहे.

जिगरबाज कामगिरी करणार्‍या सलीम शेखवर आम्हाला अभिमान असल्याचे त्याच्या कुटुंबियांनी म्हटले आहे. सलीम अनेक भाविकांचे प्राण वाचवून मोठी बहादुरी दाखवली आहे. काश्मीरमध्ये कितीही दहशतवादी हल्ले झाले तरीही पतीला अमरनाथ यात्रेला पाठवेल, असे सलीमच्या पत्नीने म्हटले आहे.  जम्मू-काश्मीर सरकारने सलीमला तीन लाखांचे बक्षीसही जाहीर केले आहे.
 
खुदाने हिंमत दिली...
> तुफान फायरिंग सुरू होती. वाकून गाडी चालवू लागलो. शेजाऱ्याला गाेळी लागली. तरी थांबलो नाही. खुदानेच हिंमत दिली.
-शेख सलीम गफूर, बसचा चालक
 
सलीम मूळचा खान्देशातील...
बहाद्दर सलीम मूळचा जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील आहे. तो सध्या गुजरातमध्ये राहत असल्याची माहिती समोर आली आहे. सलीम हा काही काळ भडगाव तालुक्यातही खासगी वाहन चालक म्हणून होता. नंतर त्याचे संपूर्ण कुटुंब गुजरातमध्ये स्थायिक झाले. त्याच्या धाडसाची चर्चा भडगाव तालुक्यासह त्याच्या गावातही आहे. मंगळवारी त्याच्या गावातील घरी दिवसभर अनेक लोक भेट देत होते.  त्याच्या आत्या बहिणीने सलीमच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

सलीमच्या आजोबांनी बांधले होते शिवमंदीर...
पिंपरखेड येथे सलिमच्या आजोबांनी शिवमंदिर बांधले होते. इतिहासिकालीन पारेश्वर महादेव या नावाने ते प्रचलीत आहे. सलिमच्या आत्या बहिणीने सांगितले की, हिंदु-मुस्लिम असा आम्ही कधीही भेद करत नाही. गावात सलोख्याने राहातो. हिंदुंचे सर्व सण मोठ्या उत्सवात साजरे करतो.

दरम्यान, अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर अंदाधुंद गोळीबार करून दहशतवाद्यांनी 7 भाविकांचे प्राण घेतले. मृतांत गुजरातच्या पाच तर महाराष्ट्रातील पालघर येथील दोन महिलांचा समावेश आहे.

पुढील स्लाइडवर  क्लिक करून वाचा... दहशतवाद्यांसमोर न डगमगता सलीमने दोन किलोमीटरपर्यंत सुसाट नेली बस...
बातम्या आणखी आहेत...