( रस्त्यावरील तुप एकत्र करत असताना वाल्मिकी समाजातील लोक)
अहमदाबाद - गुजरातच्या रुपाल गावात शनिवारी सकाळी रस्त्यांवर तुपाच्या नद्या वाहताना दिसून आल्या. नवमीच्या शुभमुहूर्तावर पल्ली येथे माताजींची सवारी निघाली. या दरम्यान भक्तांनी या वरदाईनी मातेचे साडे पाच लाख लिको शुद्ध तुपाने अभिषेक घातला. या तुपाची किंमत जवळपास 16 कोटी रुपयांइतकी असल्याचे सांगण्यात येते. अंदाजे 11 भक्तांनी माताजीचे जर्शन घेऊन त्यांच्या शुद्ध तुपाने अभिषेक केला. या दरम्यान गावातील नद्या नाल्यांमध्ये सर्वत्र तुपाच्याच नद्या वाहात होत्या.
माताजीच्या बहूमुल्य अलंकारांच्या सुरक्षेसाठी अभिषेकाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. तसेच 600 पोलिस जवानही तैनात करण्यात आले होते. भक्तांचे नवस पुर्ण झाल्याने मोठ्या प्रमाणात भक्त माताजींच्या दर्शनासाठी रुपालमध्ये नवरात्रीच्या नवमीला येतात आणि या वरदाईनी मातेचे शुद्ध तुपाने अभिषेक करतात.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, शुद्ध तुपाच्या नदीचे फोटो, (सर्व फोटो - दिव्य भास्कर)