आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात पोटनिवडणूक : बडोदा पुन्हा भाजपकडे, काँग्रेसने विधानसभेच्या दोन जागा जिंकल्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीची जागा कायम ठेवत बडोदा लोकसभा मतदारसंघ सोडल्यामुळे येथे पोटनिवडणूक झाली आणि त्यात पुन्हा एकदा भाजप उमेदवार विजयी झाला आहे. येथील भाजप उमेदवार रंजनबेन भट्ट यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पराभूत करत ही जागा कायम ठेवली आहे. 13 सप्टेंबर रोजी गुजरातमध्ये लोकसभेच्या एका जागेसह विधानसभेच्या नऊ जागांसाठी पोटनिवडणूक झाली होती. त्याची मतमोजणी आज (मंगळवार) सकाळी 8 वाजतापासून सुरु झाली आहे.

बडोदा लोकसभा आणि मणिनगर विधानसभा या जागांवर आधी पंतप्रधान मोदी प्रतिनिधीत्व करीत होते, त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष्य इकडे लागून राहिले आहे. बडोदा लोकसभा आपल्या ताब्यात ठेवण्यात भाजप यशस्वी झाली आहे.
विधानसभेवर नजर
काँग्रेस:
डीसा: काँग्रेसचे गोवाभाई रबारी विजयी
मांगरोड: काँग्रेसचे बाबूभाई वाजा विजयी

भाजप:

आणंद: रोहित पटेल विजयी
तलाजा: शीवाभाई गोहिल विजयी
मातर: केसरी सिंह सोलंकी विजयी
लीमखेडा: विंछीयाभाई भुरीया विजयी
टंकारा: वर भाजपचा झेंडा, 11731 मतांनी आघाडी
खंभाडिया: मुलुभाई बेरा आघाडीवर