आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Came New Turn In Naranpura\'s Girl\'s Murder By Her Lover Case.

PHOTO - प्रेयसिच्या सहमतीनेच प्रियकराने केली तिची हत्या, दोघेही संपवणार होते आयुष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(व्हिडीओः उत्तरायणाच्या दिवशी शाहिबाग येथील गोविंदम हॉटेलमधून बाहेर पडताना बिरबल आणि वंदना )

अहमदाबादः
नारायणपूरा भागात गुरूवारी झुडूपांमध्ये बसलेल्या जोडप्यातील तरूणीवर चार अज्ञात तरूणांनी बलात्काराचा प्रयत्नानंतर हत्या केल्याच्या प्रकरणाने आता वेगळेच वळन घेतले आहे. पोलिसांच्या तपासणीत वंदनाची हत्या महाराष्ट्रातून आलेला प्रियकर बिरबल प्रसाद यानेच केल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांना बिरबलच्या सामानातून एक सुसाईड नोट मिळाली आहे. या सुसाईडनोटमधून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सुसाईड नोटमधील मजकूरानुसार वंदना आणि बिरबलच्या साखरपुड्यास कुटुंबियांनी नकार दिल्यानंतर वंदनाचे कुटुंबिय बिरबलला सतत अपमानित करत होते. एवढेच नव्हे तर या सततच्या अपमानामुळे दोघांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. दोघांनी एकत्र येऊन असे ठरवले होते की, पहिले बिरबल वंदनाची हत्या करणार आणि त्यानंतर तो स्वतःही आत्महत्या करणार. याच निर्णयानुसार उत्तरायणाच्या रात्री बिरबलने वंदनाची हत्या केली, मात्र आत्महत्याचा प्रयत्न केल्यानंतरही तो बचावला आहे.
बिरबलच्या सामानातून मिळालेल्या चिठ्ठीत पुढे असे लिहिले आहे की, मी जे काम करणार आहे, ते काम खुपच लज्जास्पद आणि वाईट आहे. पण मी असहाय्य आहे. मला पैसे आणि इज्जतीमुळेच खुप अपमानीत करण्यात येत आहे...

या प्रकरणी पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, जखमी तरूणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्याची निट चौकशी करता आलेली नाही. तर तरूणीचे कुटुंबिय काल रात्री वेरावलवरून आले होते आणि ते तरूणीचा मृतदेह घेऊन घरी परतले आहेत. तरूणीच्या वडीलांनी वंदना आणि बिरबल यांचे कसल्याच प्रकारचे संबंध नसल्याचे सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वंदना ही प्रियकर बिरबलच्या वहिनीची चुलत बहीण होती. तर पोलिसांनी या घटनेस निर्भया प्रकरणासारखे कृत्य असल्याच्या संशयास नकार दिला आहे.

पुढील स्लाईडवर पाहा, या घटनेची इतर छायाचित्रे...