आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Car And Truck Accident On National Highway 8 In Surat

सुरतः भरधाव कारने दिली ट्रकला धडक, पाच जण जागीच ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरतः राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 वर कोसंबाच्या जवळ एक कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात कार चालकासमवेत इतर पाच जणांचा मृत्यू झाला. चालकाचा परवाना आणि मोबाईल क्रमांकावर संपर्क केल्यानंतर अशी माहिती मिळाली आहे की, या अपघातात मृतपावलेले सर्वच लोक बडोदा येथील रहिवाशी होते.
आज सकाळी ९ च्या सुमारास एक मारूती स्विफ्ट कार (क्र.जीजे.-6 एफ.क्यु 2862) मधून प्रवास करत असलेले पाच जण बडोद्यावरून सुरतमार्गे मुंबईला जात होते. राष्ट्रीय महामार्ग क्र. 8 वर कोसंबा येथे असलेल्या नरोली गावाजवळील सियालज क्रॉस रोडवर ही कार एका ट्रकला धडकली. प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार अपघातावेळी कारचा वेग ताशी 110 किमीएवढा होता. तेव्हा चालकाला रस्त्यावरच थांबलेला ट्रक न दिसल्याने हा अपघात झाला.

पुढील स्लाईडवर पाहा, या अपघाताची अंगावर शहारा आणणारी इतर छायाचित्रे...