आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कार खर्‍या मालकास पुन्हा सोपवण्यात यावी का, गुजरात न्यायालयाने केली चोराला विचारणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - गुजरातमधील एका न्यायालयाने कार चोरास समन्स पाठवले आहेत.चोरी प्रकरणी न्यायालयीन कारवाई करायची म्हणून नव्हे तर त्याने जी कार चोरली होती ती कारच्या खर्‍या मालकास पुन्हा सोपवण्यात यावी का अशी विचारणा करणारी ही नोटिस आहे.याबाबतीत त्याचे काय म्हणणे हे न्यायालय समजावून घेणार आहे. याचाच दुसरा अर्थ चोराची साक्ष होईपर्यंत मालकास आपल्या कारची वाट पाहावी लागणार आहे. कार चोर उलटला तर कायद्याची ही लढाई आणखीनच किचकट व दिर्घ होणार आहे. याप्रकरणी 24 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
रजिस्टर एडीने नोटिस : कार चोराच्या वडोदरा स्थित घरच्या पत्त्यावर हे समन्स रजिस्टर एडीने पाठवण्यात आले आहे असे कारचे मालक अमित मेहता यांचे वकील संदीप बिलीमोरा यांनी सांगितले.
कायद्यात तरतूद नाही
अहमदाबाद सत्र न्यायालयाचे मुख्य सरकारी वकील सुधीर ब्रह्मभट यांच्या मते चोरीचा माल परत देण्याविषयी आरोपीची बाजू ऐकून घेण्याची कोणतीही तरतूद सीआरपीसी कायद्यात नाही.जेष्ठ वकील गुलाबखान पठाण यांनी सांगितले की, सीआरपीसीमध्ये तरतूद नसली तरीही चोरीचा माल परत देण्यापूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेण्यात यावे असे सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशात म्हटले आहे.
आरोपीने नकार दिल्यास
अनेकवेळा चोरीच्या आरोपीने वस्तू परत देण्यास आक्षेप घेतल्यास मालकालाच आपल्या वस्तूवरील मालकीहक्क सिध्द करावा लागतो.अशावेळी मूळ मालकास आपल्या मौल्यवान वस्तू परत मिळवण्यासाठी ्प्रदिर्घ कायदेशीर लढाईस सामोरे जावे लागते.
असा हा किस्सा
अहमदाबादच्या मणिनगरचे रहिवासी अमित मेहता यांची कार काही दिवसांपूर्वी चोरीस गेली.मेहता यांनी पोलिस ठाण्यात रितसर त्याची तक्रार दिली.प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. काही दिवसानंतर वडोदरा पोलिसांनी अमित यांना कळवले की,रामू पंचाल नामक एक चोर पकडला असून त्यानेच तुमची कार चोरली आहे. माहिती मिळाल्यानंतर अहमदाबाद पोलिसांनी चोर आणि कार दोघांनाही शहरात आणले.त्यानंतर मेहता यांनी कार परत मिळवण्यासाठी न्यायालयात अपील केले.पोलिसांनीही न्यायालयात ‘ना हरकत’ (एनओसी) प्रमाणपत्र दिले. मेहता यांना वाटले की आता आपल्याला कार परत मिळेल परंतु शनिवारी न्यायालयाने आरोपी पंचाल यास नोटिस जारी करून त्याची बाजू ऐकू न घेणार असल्याचे सांगितले.