आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरातचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणी दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेशण विभागाने पुरवणी आरोपपत्र तयार केले आहे. त्यात मोदींचे निकटवर्तीय असलेले माजी मंत्री अमित शहा यांचे नाव वगळण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मोदींसह अमित शहा यांच्यासाठीही हा मोठा दिलासा आहे.
जून 2004 मध्ये गुजरात पोलिसांसोबत झालेल्या कथित चकमकीत इशरतसह 4 जण ठार झाले होते. हे चौघे लष्कर ए तोयब्बाचे अतिरेकी असून ते गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची हत्या करण्यासाठी निघाले होते, असा दावा पोलिसांनी केला होता. परंतु, याप्रकरणाची चौकशी करणा-या न्यायालयीन समितीने चकमक खोटी ठरविली होती. त्यानंतर तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला होता.
इशरत मुळची ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे राहत होती. ती लष्कर-ए-तोयबाची दहशतवादी नव्हती. तसेच ही ही चकमक बनावटच होती, असे सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात स्पष्ट केले होते. त्यामुळै अमित शहा अडचणीत आले होते. परंतु, आता त्यांचे नाव पुरवणी आरोपपत्रातून वगळण्यात आले आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेले नरेंद्र मोदी यांच्यासाठी हा मोठा दिलासा आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.