आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CBI Investigated The Vanjara In Sabarmati Prison

साबरमती तुरुंगात वंजारांची सीबीआयकडून चौकशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदीं व माजी गृहराज्यमंत्री अमित शहा यांच्यावर शरसंधान करणारे गुजरातचे निलंबित आयपीएस अधिकारी डी.जी.वंजारा यांची शुक्रवारी सीबीआयने साबरमती आश्रमात चौकशी केली. वंजारांच्या चौकशीमुळे मोदींचे विश्वासू शहा अडचणीत येण्याची शक्यता आहे. वंजारा वादग्रस्त इशरत जहाँ चकमकीप्रकरणी अटकेत आहेत.

सन 2004 मधील इशरत जहाँ चकमकीप्रकरणी सीबीआयने वंजारा यांना मुख्य आरोपीच्या यादीत टाकले आहे. वंजारा यांनी पाठवलेल्या राजीनामा पत्रामध्ये मोदींवर तोंडसुख घेतले होते.त्याप्रकरणी सीबीआय अधिकार्‍यांनी शुक्रवारी साबरमती तुरुं गात जाऊन वंजारा यांची चौकशी केली. दहशतवादाचा निपात करताना गुजरात सरकारने अवलंबलेल्या धोरणाची अंमलबजावणी करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांना मोदी सरकारने वार्‍यावर सोडले असा आरोप वंजारा यांनी आपल्या पत्रामध्ये केला होता.1 सप्टेंबर रोजी वंजारा यांनी आयपीएस पदाचा राजीनामा पत्रात हा आरोप केला होता. 59 वर्षीय वंजारा सन 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

अमित शहांवर गलिच्छ क्लुप्त्यांचा आरोप करणार्‍या वंजारांना सीबीआयच्या चौकशीत नेमक्या याबद्दलच छेडण्यात आले. गृहराज्यमंत्री पदावर असताना शहा कोणत्या क्लृप्त्या वापरतात असा प्रश्न सीबीआय अधिकार्‍यांनी केला.