आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचा शपथविधी आणि गुजरातमध्‍ये संचारलेला उत्‍साह, पाहा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्‍या लोकप्रियतेची वेगळी लाट निर्माण करून प्रचाराच्‍या जोरावर भापजला घवघवीत यश मिळवून देणारे नरेंद्र मोदी यांनी सायंकाळी सहा वाजता पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मोदी यांच्‍या पंतप्रधान शपथविधीचा सोहळा पाहण्‍यासाठी देशभरातील जनता वाट पाहत होते. नरेंद्र मोदी यांच्‍या आई हीराबा यांनाही आपला मुलगा पंतप्रधान पदाची शपथ घेताना पाहण्‍याचा मोह आवरता आला नाही. आपला मुलंगा पंतप्रधान होणार याचा आनंद हीराबा यांना लपवता आला नाही. त्‍या सकाळपासून टीव्‍ही समोर बसुन होत्‍या. गुजरातमधुन 40 व्‍यक्तिंना या सोहळ्यासाठी निमंत्रीत करण्‍यात आले.
मात्र मोदी यांच्‍या परिवारातील एकही व्‍यक्‍ती सोहळ्यासाठी दिल्लीमध्‍ये गेली नाही, तर त्‍यांनी घरी बसूनच या सोहळ्याचा आनंद घेतला. या शपथविधीचा सोहळा गुजरातमध्‍ये दिवाळीसारखा साजरा करण्‍यात आला. पूर्ण गुजरात मोदीमय झाले होते. चांगले दिवस येणार ! चा नारा गुरातच्‍या प्रत्‍येक गल्लीमध्‍ये दिला जात होता.
पुढील स्‍लाईडवर पहा काही छायाचित्रे...