आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरातचे 'रण' : सलमान खान, अक्षय कुमारसह 20 सेलिब्रिटी करणार BJP साठी मेगा कॅम्पेन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीनगर - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे 14 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे निवडणूक प्रचारात रंग भरण्यासाठी बाजप आणि काँग्रेस आता सेलिब्रिटींना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आङे. बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांसह टीव्हीवरील काही चेहरेही मतदानात प्रचारात उतरलेले पाहायला मिळणार आहे. सलमान खान, अक्षय कुमार आणि अजय देवगणसह 20 पेक्षा अधिक अॅक्टर-अॅक्ट्रेसेस भाजपसाठी प्रचार करणार आहेत. तर महिमा चौधरी, अमिषा पटेल, रितेश देशमुख, नगमा आणि राज बब्बर काँग्रेसच्या मंचावर असतील. 


मेगा स्टार्सद्वारे मेगा प्रचाराचा भाजपचा प्लान 
भाजप प्रचारामध्ये सलमान खान, अक्षय कुमार, अझय देवगण, विवेक ओबेरॉय जॅकी आणि टायगर श्रॉफ, शिल्पा-शमिता शेट्टी, बिपाशा बासू आणि प्रिती झिंटा अशा सेलिब्रिटींना उतरवणार आहे. तसेच खासदार हेमा मालिनी आणि मनोज तिवारीही प्रचारात असणारच आहेत. त्याशिवाय कॉमेडियन कपिल शर्मा आणि परेश रावल एकत्रितपणे प्रचारात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 


गुजराती कलाकार, क्रीडापटुंचाही समावेश 
नरेश कानोडिया, हितू कानोडिया, रोमा माणेक, ओसमाण मीर, अरविंद वेगडा आणि तारक मेहता का उल्टा चश्मामधील कलाकार भाजपचा प्रचार करताना दिसणार आहे. क्रिकेटर युसूफ पठान आणि इरफान पठानही पक्षाचा प्रचार करतील. त्याशिवाय सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, देवआनंदचा डुप्लिकेट हेही प्रचारात उतरतील. 


काँग्रेसच्या यादीत सेलिब्रिटींची कमतरता 
या प्रकरणात काँग्रेसची यादी मात्र कमी असल्याचे दिसत आहे. महिमा चौधरी, नगमा, रितेश देशमुख, असरानी, राज बब्बर आणि नवज्योतसिंग सिद्धू निवडणुकीत प्रचार करताना दिसतील. 


तारखा आणि ठिकाणांची घोषणा नाही 
या सेलिब्रिटींच्या प्रचाराच्या नियोजित कार्यक्रमाबाबत मात्र अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही. दोन्ही पक्षांनी केवळ त्यांच्या प्रचारातील कलाकारांची नावेच सांगितलेली आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, यापूर्वी प्रचारात उतरलेल्या काही सेलिब्रिटींचे PHOTOS..

बातम्या आणखी आहेत...