आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोडनानींवरील दोषारोप कायमच, टायपिंगच्या चुकीवर गुजरात उच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - गुजरातच्या माजी मंत्री माया कोडनानी यांना दोषी ठरवण्यास स्थगिती दिलेली नाही, ती टायपिंगची चूक होती, असे स्पष्टीकरण गुजरात उच्च न्यायालयाने दिले आहे. माया कोडनानी यांना २००२ मधील नरोडा पटिया दंगल प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने २८ वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. ३० जुलै रोजी कोडनानींना जामीन देण्यात आला.

कोडनानींच्या वकिलाने या आदेशावर स्पष्टीकरण मागितले होते. त्यावर न्यायमूर्ती व्ही. एम. सहाय आणि न्यायमूर्ती आर. पी. ढोलरिया यांच्या न्यायपीठाने म्हटले की, कोडनानींच्या जामीन अर्जावर विचार करताना जामीन मंजूर करण्याच्या कारणात आम्ही कुठेही ‘कनव्हिक्शन’ हा शब्द नोंदवला नाही. मात्र टायपिंगच्या चुकीमुळे ३० जुलै २०१४ च्या आदेशातील मधील चौथ्या ओळीत ‘कन्व्हिक्शन अँड’ हा शब्द जोडला गेला.