आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशरत जहाँ बनावट एन्काऊंटर प्रकरणी मोदींचे निकटवर्तीय अमित शहा यांना दिलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणी केंद्रीय गु्न्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुरुवारी अहमदाबादच्या मिर्झापूर कोर्टात पुरवणी आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात गुप्तचर संस्थेचे (आय.बी) माजी संचालक राजेंद्र कुमार आणि इतर तिन अधिका-यांना आरोपी करण्यात आले आहे. त्या तीन अधिका-यांमध्ये पी. मित्तल, एम.के.सिन्हा आणि राजीव वानखेडे यांचा समावेश आहे.

राजेंद्र कुमार यांच्यावर शस्त्र उपलब्ध करण्याचा आणि इतर तिघांवर हत्या आणि षडयंत्राचा आरोप ठेवण्यात आला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय आणि माजी गृहमंत्री अमित शहा यांना यात दिलासा मिळाला आहे. त्यांचे नाव आरोपपत्रात अजून आलेले नाही.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय आहे प्रकरण