आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार्टर्ड अकाउन्टंटही करू शकतील जाहिराती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - सामान्य क्षेत्रांप्रमाणेच चार्टर्ड अकाउन्टंट (सीए) देखील आपल्या सेवेची जाहिरात करताना दिसतील. जाहिरात करण्यासंबंधीची परवानगी देण्याच्या प्रस्तावावर विचार विनिमय सुरू आहे. प्रमुख सीए फर्मच्या तुलनेत मध्यम व्यवसायातील सीएना योग्य प्रोत्साहन मिळत नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर यासंबंधी विचार सुरू झाला आहे. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) एथिकल स्टँडर्ड बोर्डकडून या प्रस्तावावर विचार सुरू आहे. आयसीएआयने आपल्या सर्व सदस्यांकडून इ-मेलवरून सूचना मागवल्या आहेत. सूचना मागवण्याचा टप्पा संपल्यानंतर मंडळ आपल्या शिफारशी केंद्रीय परिषदेकडे पाठवणार आहे.


ओळख निर्माण करण्यासाठी लागतात अनेक वर्षे
> केंद्रीय परिषद या मुद्द्यावर अंतिम निर्णय घेईल. आता सीए कोणत्याही प्रकारे स्वत: ची जाहिरात करू शकत नाही.
> एखादा सीए इतरांच्या तुलनेत आपली फीस कमी ठेवत असेल तरीदेखील त्याला त्याची जाहिरात करता येत नाही.
> नवीन सीए फर्म सुरू करणा-यांना स्वत:च्या फर्मला प्रोत्साहन देण्यासाठी माऊथ पब्लिसिटीवरच अवलंबून राहावे लागते.
> म्हणूनच बाजारपेठेत आपली ओळख बनवण्यासाठी सीए व्यावसायिकांना अनेक
वर्षे लागतात.
परवानगीचे स्वरूप कसे असू शकेल ?
०टेलिफोन डिरेक्टरीमध्ये स्वत: किंवा फर्मचे नाव प्रकाशित करण्याची परवानगी.
०ग्रीटिंग काडर्स व निमंत्रणपत्रिकेवर फर्मचे नाव छापण्यास परवानगी.
०फीस रेट आणि क्लायंट्सचे नाव छपाईची परवानगी.
०ज्या क्षेत्रातील तज्ज्ञता असेल त्याची यशस्विता आणि नावाचा प्रचार करण्यास परवानगी.
०फर्मचा सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून प्रचार-प्रसार.
०मिळालेल्या पुरस्कारांना जाहीरपणे मांडण्यास संमती.


चांगले वातावरण निर्माण होईल
जर सीए फर्मला जाहिरातीची परवानगी मिळाली तर छोट्या आणि मध्यम स्तरावरील सीएसाठी चांगले वातावरण तयार होऊ शकेल.’’ सुनील तलाटी, माजी अध्यक्ष, आयसीएआय.