गुजरातच्या चिखली गावात एका वर्षापूर्वी पिण्याचे पाणी आणि मुलभूत सुविधांची वाणवा होती. पण आता या गावाची आदर्श गावाकडे वाटचाल होत आहे. एका वर्षाच्या कालावधित येथील 450 घरांमध्ये पाण्याची सोय झाली. घरोघरी शौचालय, रस्त्यांवर सीसीटीव्ही अशा विविध सुविधा येथे करण्यात आल्या आहेत. या विकासात येथील खासदार सी. आर. पाटील यांची महत्त्वाची भूमिका आहे.
- भाजप खासदार पाटील यांनी एका वर्षात या गावाचा कायापालट केला.
- गाव दत्तक घेऊन त्यांनी येथे मुलभूत सुविधांची उपाययोजना केली.
- एका वर्षात 3 कोटी रुपयात त्यांनी ही विकासकामे केली आहेत.
- याशिवाय सुमारे अडीच कोटी रुपये ग्रामपंचायतने विकासकामांवर खर्च केले.
- चकाचक रस्त्यांनी हे गाव शहराला जोडले आहे.
- सरपंच ज्योतीबेन यांनी सांगितले की, पर्यावरणाचा विचार करून कामे केली आहेत.
- घाण पाण्याला फिल्टर प्लांट लावण्यात आला आहे.
असे पालटले गावाचे रुप..
- 20 लाख रुपयातून घरोघरी नळ जोडणी.
- 172 शौचालय बांधण्यासाठी 2 लाख रुपये खर्च.
- 10 लाख रुपये खर्चून लावले सीसीटीव्ही.
- 06 लाख रुपयांमध्ये वृक्षारोपण केले.
- 20 लाख रुपये स्वच्छतेसाठी खर्च केले.
- 20 लाख रुपयात रिव्हरफ्रंट तयार केले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, असे झाले चिखली गाव..