आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

८४ लाख शालेय विद्यार्थ्यांना ट्रॅक केले जाणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदा - गुजरातच्या शाळेतील पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांची सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ट्रॅकिंग होणार आहे. सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारणे आणि शाळा गळतीचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने ‘चाइल्ड ट्रॅकिंग सिस्टिम’ सुरू करण्यात येत आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून गुजरात सरकार ८४ लाख शालेय विद्यार्थ्यांना १८ डिजिटचा युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक देणार आहे.

या क्रमांकाच्या आधारे विद्यार्थ्याला ट्रॅक केले जाईल. यात पहिले ११ डिजिट स्कूल डायस कोड आहेत. त्यानंतरचे दोन अंक प्रवेश वर्ष दर्शवतात. त्यानंतर विद्यार्थी आहे की विद्यार्थिनी हे दर्शवणारा क्रमांक आहे. अखेरचे ४ अंक विद्यार्थ्यांचा आयडी नंबर आहे. या आयडीच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा प्रवेश, हजेरी, त्याला मिळणारे लाभ, त्याचा शैक्षणिक स्तर अशी सर्व माहिती मिळू शकते. या सर्व माहितीचा आढावा घेण्यासाठी एक गट काम करेल. एखादा विद्यार्थी अभ्यासात कच्चा असेल तर त्याचा स्तर उंचावण्याचा प्रयत्न केला जाईल.

विद्यार्थी शाळा सोडून गेला, तो शिकत आहे वा नाही, तो कोणत्या शाळेत शिकतो आहे, ही सर्व माहिती या प्रणालीत अपडेट करता येते. ही प्रणाली सध्या खासगी व सरकारी शाळा मिळून ३४ हजार प्राथमिक व ७ हजार माध्यमिक शाळांत सुरू करण्यात येत असल्याचे सर्व शिक्षा अभियानाचे राज्य समन्वयक मुकेश कुमार यांनी सांगितले. यात ८४ लाख विद्यार्थ्यांना आयडी देण्यात येईल. एखाद्या विद्यार्थ्याने ५० टक्केपर्यंत प्रगती केली असेल तर त्यात सुधारणा करण्यासाठी संबंधित शाळेच्या शिक्षकांनी काय प्रयत्न करावे, यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येते. यात नॉलेज बिल्डिंगसह बिल्डिंग एज लर्निंग एडसारखे शैक्षणिक कार्यक्रम आहेत. सध्या हे प्राथमिक स्तरावर लागू करण्यात आले आहे. सध्या १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांशिवाय कोणाचीच माहिती उपलब्ध नसल्याचे शिक्षक बन्सीलाल ठक्कर यांनी सांगितले. नव्या प्रणालीमुळे वर्तमानातील अपडेट्स व शैक्षणिक प्रगतीचा आलेख तयार करता येईल. पालकही संकेतस्थळावर पाल्याचा आयडी टाकून सर्व माहिती मिळवू शकतील, अशी माहिती मुख्याध्यापिका पल्लवी परमान यांनी दिली.

प्रणालीची कार्यपद्धती
चाइल्ड ट्रॅकिंग सिस्टिममध्ये विद्यार्थ्याचे ऑटोमॅटिक अपग्रेडेशन होते. प्रवेश देताना शाळांना त्याची ऑनलाइन एंट्री करावी लागते. यात विद्यार्थ्याचे नाव, पत्ता, शहर, जिल्हा, तहसील व शाळेचा कोड क्रमांक तसेच १८ डिजिटचा युनिक आयडी दिला जातो. विद्यार्थ्याने शाळा सोडली तर त्याचा क्रमांक त्यातून आपोआप डिलिट होतो. पुन्हा ज्या शाळेत प्रवेश घेतलाय तिथे त्याचे नाव अपडेट होते. आता टीसीच्या मागे हा युनिक कोड क्रमांक लिहिणे अनिवार्य करण्यात आले आहे.