फोटो - रिव्हरफ्रंटवर नजा-यांचा आनंद लुटताना मोदी व जिनपिंग.
अहमदाबाद - चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना पंतप्रधान
नरेंद्र मोदी स्वतः साबरमती आश्रम दाखवण्यासाठी घेऊन गेले. जिनपिंग यांनीही आश्रमात खादीचे जॅकेट परिधान करुनच प्रवेश केला. नरेंद्र मोदी यांनी आश्रमात जिनपिंग यांचे खादीची (सुती) माळ घालून स्वागत केले. त्यानंतर साबरमती रिव्हरफ्रंटवर जिनपिंग आणि मोदी यांनी भोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर जिनपिंग यांनी झोक्यावर बसून येथील नजा-यांची मजा लुटली.
त्याआधी मोदींनी हॉटेल हयातमध्ये जिनपिंग यांचे स्वागत केले. हॉटेलच्या लॉबीमध्ये लावण्यात आलेल्या फोटोद्वारे गुजरातमध्ये असलेला बौद्ध धर्माचा वारसा उलगडून सांगितला. बौद्ध धर्माशी संबंधित फोटो दाखवत जिनपिंग यांना संस्कृतीबाबत माहिती देण्याचा प्रयत्नही केला. मोदी आणि जिनपिंग यांनी एकमेकांशी चर्चा केली. त्यानंतर दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत तीन करारांवर सह्या झाल्या. हे करार ग्वांगझाऊच्या धर्तीवर अहमदाबादचा विकास, बडोद्यात इंडस्ट्रियल पार्क आणि गुजरातच्या विकासासाठी चीनच्या ग्ंवागडोंग प्रांताची मदत घेण्याच्या संदर्भात आहेत.
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास भारतात पोहोचले. त्यांचे विमान ठरलेल्या वेळेपेक्षा 20 मिनटे उशीरा अहमदाबाद विमानतळावर उतरले. ते दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी पोहचणार होते. त्यांच्या स्वागतासाठी राज्यपाल आणि गुजरातच्या मुख्यमंत्री उपस्थित होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हॉटेलमध्ये राष्ट्रपतींचे स्वागत करणार आहेत. चीनी राष्ट्रपतींबरोबर त्यांच्या पत्नीही आहेत.
काँग्रेसची टीका
चीनच्या राष्ट्रपतींच्या दौ-याबाबत काँग्रेसने सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला आहे. कांग्रेस प्रवक्ते राजीव शुक्ला म्हणाले की, ' असे चालणार नाही. ए
किककडे त्यांचे सैन्य
आपल्या जमिनीवर ताबा घेत आहेत आणि आपण त्यांना ढोकळा, फाफडा खाऊ घालतो. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए सरकार सत्तेवर असताना भाजपनेही अशीच भूमिका घेतली होती. पाकिस्तानी पंतप्रधानांच्या दौ-याला विरोध करत भाजपने टीका केली होती की, ए
किकडे आपल्या जवानांची हत्या होत आहे, आणि सरकार त्यांच्या पंतप्रधानाला बिर्याणी खाऊ घालत आहे.
दुतावासाबाहेर आंदोलन
चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांच्या विरोधात दिल्लीतील चीनी दूतावासाबाहेर तिबेटीयन नागरिकांनी जोरदार आंदोलन केले. याठिकाणी आंदोलनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्याशिवाय अनेकांना ताब्यातही घेण्यात आले आहे. स्वतंत्र तिबेटची मागणी करणा-या आंदोलकांनी पंतप्रधानांनी आपली बाजू चीनच्या राष्ट्रपतींसमोर मांडावी अशी मागणी केली आहे. तसेच चीनने तिबेटवरील ताबा सोडण्याबाबत भूमिका मांडावी असेही म्हटले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा जिनपिंग यांच्या दौ-याशी संबंधित PHOTO...