(पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराचे फोटो घेणारे चीनच्या शिष्टमंडळाचे सदस्य.)
वडनगर (गुजरात) - पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या उत्तर गुजरातमधील वडनगरमधील वडिलोपार्जित घराचे दर्शन घेण्यासाठी परदेशी लोक येऊ लागले आहेत. चीनच्या दुतावासातील चार सदस्यांचे शिष्टमंडळ शनिवारी वडनगरमध्ये आले होते. या शिष्टमंडलाने याठिकाणी बौद्ध स्तूप आणि वृद्धाश्रमाबरोबरच नरेन्द्र मोदींचे जन्मस्थळ असलेल्या घरालाही भेट दिली.
चीनच्या दुतावासातील यु व्ही वेजुनू यांनी मोदींच्या घराच्या दर्शनानंतर स्थानिक प्रशासनाला या ठिकाणावर एक माहितीफलक लावण्याचा सल्लाही दिला. या ऐतिहासिक शहराला भेट दिल्यानंतर वेजून म्हणाले की, याठिकाणी येऊन मी अत्यंत आनंदी आहे. ही भेट कायम माझ्या स्मरणात राहील. या शिष्टमंडळाबरोबर भारतीय पुरातत्व विभागाचे संचालक वाय.ए.रावतही वडनगरला आले होते. त्यांनी या शिष्टमंडळाला माहिती दिली.
PHOTO पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्वर...