आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडोदरा येथे क्लोरीन वायूची गळती;100 नागरिक श्वसनाच्या त्रासामुळे रुग्णालयात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडोदरा- येथील पोर गाव येथे जलशुद्धीकरण प्रकल्प असून तेथे क्लोरीन वायूची गळती झाल्याने १०० हून अधिक लोकांना उलटी, डोळे व छाती व गळ्यात जळजळीचा त्रास होऊ लागला. वायू गळतीचा त्रास होऊ लागणाऱ्या लोकांच्या  रुग्णालयात रांगा लागल्या. या वायुगळतीमुळे गावात मोठी खळबळ उडाली. यामध्ये दोघांची प्रकृती गंभीर आहे.
 
नवीनगरी आणि स्थानिक बॉम्बे हाउसिंग परिसरातील लोक वायुगळतीच्या टप्प्यात आले. दुसरीकडे जीएसीएलच्या पथकाच्या मदतीने वायुगळतीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या पथकाने १०० किलोग्रॅमच्या बाटलीला घटनास्थळावरून काढून ती ढाढर नदीत बुडवली.

परिस्थिती नियंत्रणात...
वडोदरा ग्रामीणचे तहसीलदार अनिल पटेल यांनी म्हटले पोर येथील प्रकल्पातून १०० किलो क्लोरीन  असलेल्या बाटलीतून गळती होत होती. जीएससीएल पथकाच्या मदतीने वायुगळतीवर नियंत्रण ठेवण्यात आले. क्लोरीनची गळती झाल्याने लोकांच्या डोळ्यात, छातीत आणि गळ्यात जळजळ होऊ लागली होती. सुमारे १५ लोकांना उपचारासाठी वडोदऱ्यातील सयाजी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतरांची प्रकृती सुधारण्याच्या मार्गावर आहे.
बातम्या आणखी आहेत...