आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामान्यांच्या तक्रारीने पालिकेतील बाबूंना चाप, महापौरांना नागरिकाचा फोन जाताच तत्काळ कार्यवाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - डोंट अंडरइस्टिमेट द पॉवर ऑफ कॉॅमन मॅन, हा चेन्नई एक्स्प्रेस चित्रपटातील शाहरुख खानचा डायलॉग आठवत असेल. याच सामान्य माणसाकडे दुर्लक्ष केल्यानंतर काय हाल होतात याचा अनुभव अहमदाबाद महापालिकेच्या अधिका-यांना चांगलाच आला आहे. येथील सामान्य माणसाने आवाज उठवल्यानंतर लेटलतीफ बाबूंना चांगलीच चपराक बसली आहे. महापौरांनी एका व्यक्तीच्या फोनची दखल घेत अधिका-यांना फटकारले.

त्याचे झाले असे, अहमदाबादच्या कालूपूर भागातील रहिवासी अतुल भावसार महापालिकेत गेले होते. तेथे मालमत्ता विभागात माहितीच्या अधिकाराखाली अर्ज देण्यासाठी ते गेले होते. मात्र, एकही अधिकारी नव्हता. अधिकारी बाहेर गेले आहेत, २.३० वाजता परत येतील, असा निरोप कर्मचा-यांनी दिला. अधिका-याची वाट बघत ते ताटकळत बसले होते. २.४० वाजले तरी कोणीच फिरकले नाही. अन्य एका कर्मचा-याने आणखी पाच मिनिटे वाट पाहण्यास सांगितले. अखेर २.४५ वाजले तरी कोणीच अधिकारी फिरकला नाही. यानंतर भावसार यांनी महापौरांना फोन लावला. महापौर मीनाक्षी पटेल यांनी दहा मिनिटांत पोहोचते, असे सांगत त्यांना थांबण्यास सांगितले. १० मिनिटांत त्या आल्या. आपल्या दालनात जाण्याऐवजी त्यांनी मालमत्ता विभागात जाऊन भावसार यांची भेट घेतली आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
हजेरी रजिस्टरनुसार अधिका-यांची नावे घेतली तेव्हा दोघांची उपस्थिती जाणवली. दुपारी ३.०० वाजता असाच प्रयत्न झाला तेव्हा पाच-सहा अधिकारी पळत आले. या वेळी महापौरांनी सर्वांना फैलावर घेतले.

क्रारीवर तत्परतेने कारवाई
महापौरांसमोर खुलासा देताना अधिकारी म्हणाले, अन्य विभागात अर्थसंकल्पाबाबत काम करत होतो. त्यामुळे भावसार यांची भेट घेता आली नाही. यावर समाधान न झाल्याने महापौरांनी पुन्हा त्यांना खडसावले. आपल्या कामात चपळाई दाखवत नसाल तर गतिमान विकास कसा साध्य केला जाईल? लंचनंतर २.३० वाजता आपल्या जागेवर प्रत्येकाने बसलेच पाहिजे, अन्यथा त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल. आपल्या तक्रारीची एवढी दखल घेतली जाईल, असे वाटले नव्हते अशी प्रतिक्रीया भावसार यांनी व्यक्त केली. महापौर किंवा इतर अधिका-यांनी कामांबद्दल आत्मीयता दाखवल्याशिवाय हे शक्य नाही, असे ते म्हणाले.