आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Communal Clashes Erupts In Narendra Modi Vadodara News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नरेंद्र मोदींच्या बडोद्यात दंगल, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह फोटोंवरुन हिंसाचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- उग्र जमावाने शहरात जोरदार दगडफेक केली. अनेक दुकानांना आणि वाहनांना आग लावली.)
बडोदा (गुजरात)- दोन समुदायांमध्ये झालेल्या हिंसक घटनांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ बडोद्यात तणावाचे वातावरण तयार झाले आहे. रिझर्व्ह पोलिस आणि रॅपिड अॅक्शन फोर्ससह स्थानिक पोलिस घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, काही जण या दंगलीत जखमी झाले असून दुकाने आणि वाहनांना आग लावण्यात आली आहे.
दोन समुदायांच्या युवकांच्या बाईक एकमेकांना धडकल्या. त्यानंतर एका समुदायाविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो आणि मजकूर टाकण्यात आला. फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तो घरोघरी पोहोचला. त्यानंतर हिंसाचार सुरू झाला. त्यानंतर एका समाजाच्या लोकांनी संजय रावजी यांच्या घरावर जोरदार दगडफेक केली. या दरम्यान काही तरुणांचे लहरीपूरा दरवाना परिसरात एका वकीलासोबत भांडण झाले. या घटनेनंतर जोरदार दगडफेक सुरू झाली. उग्र जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूराचा वापर केला. अग्निशमन दलाच्या जवानांनी लगेच घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळवले.
बडोद्याचे पोलिस आयुक्त ई. राधाकृष्णन यांनी सांगितले, की दंगलीमागचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. सोशल मीडियात पसरलेल्या आक्षेपार्ह फोटोंमुळे दंगल पसरल्याचे सांगितले जात आहे.
पुढील स्लाईडवर बघा, दंगलीची छायाचित्रे....अशा प्रकारे ठिकठिकाणी आग लावण्यात आली...