आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंगलीत खाक झाली दुमजली इमारत, 60 वर्षांपासून एकत्र राहात होते हिंदु-मुस्लिम!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदा- गुजरातमधील बडोदा शहरातील फतेहपुरा भागातील परिस्थिती दुसर्‍या दिवशीही तणावपूर्ण आहे. फतेहपुरा हा बडोद्यातील अतिसंवेदनशील भाग समजला जातो. फतेहपुरा भागात रविवारी (7 जून) रात्री उशीरा भडकलेल्या दंगलीत एक दुमजली इमारत जाळण्यात आली. या इमारतीला हिंदू-मुस्लिमांचे सलोख्याचे प्रतिक मानले जात होते. या इमारतीत 60 वर्षांपासून एकत्र राहाणार्‍या पाच हिंदु-मुस्लिम कुटुंबियांना बेघर व्हावे लागले आहे.
दीपावली असो अथवा ईद सर्व सण हे पाचही कुटुंबिय गुण्यागोविंदाने साजरे करत होत. परंतु रविवारी भडकलेल्या दंगलीत होत्याचे नव्हते झाले आणि मोल-मजुरी करून आपला उदरनिर्वाह भागवणार्‍या लोकांचे संसार रस्त्यावर आले आहेत.
असा झाला वाद
फतेहपुरातील काही समाजकंटकांनी एका मंदिरातील भगवान शंकराच्या मूर्तीची विटंबना केली. यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. लोकांना रस्त्यावर उतरून प्रचंड तोडफोड केली. संतप्त जमावाने वाहने जाळली तर दुमजली इमारत पेटवण्यात आली. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रु धुराचा वापर करावा लागला.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, 60 वर्षांपासून सलोख्याने राहात होते पाच पाच हिंदु-मुस्लिम कुटुंबिय...