आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नलिया वासनाकांडाच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने, महिला काँग्रेसच्या 40 पदाधिकाऱ्यांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गांधीनगर - गुजरातची राजधानी गांधीनगर येथील रायसेन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा यांचे निवासस्थान आहे. या घरासमोर प्रदेश महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रतीकात्मक पोस्टकार्ड घेऊन नलिया वासनाकांडाच्या निषेधार्थ  निदर्शने केली. 

प्रदेश काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सोनल पटेल यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी एक पत्र लिहिले आहे.  भाईश्री नरेंद्र मोदी,  आम्हाला कोणती अडचण आल्यास मला एक पोस्टकार्ड लिहून कळवा. मी तुमची समस्या दूर करेन, असे वचन ११ वर्षांपूर्वी दिले होते; पण गुजरातेतील महिला व तरुणींचे शोषण होत आहे. आता आमची सहनशक्ती संपली असून आमची परीक्षा न घेता तुमचे भावाचे कर्तव्य पार पाडावे. आपल्या गुजरातमधील भगिनी. निदर्शनानंतर  पोलिसांनी या ४० महिलांना ताब्यात घेतले.
बातम्या आणखी आहेत...