आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Congresss' All MLA Suspended For The Noising In Gujarat Assembly

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरात विधानसभेत काँग्रेसचे सर्व ‘गोंधळी’ आमदार निलंबित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीनगर - गुजरात विधानसभेत गोंधळ घालणा-या काँग्रेसच्या सर्व आमदारांवर मंगळवारी निलंबनाची कारवाई
करण्यात आली. राज्यातील अनेक भागात पाण्याची टंचाई भासत आहे. त्यावरून विरोधी पक्षाने सभागृहात गोंधळ घातला होता.

मंगळवारी सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर विरोध पक्षनेते शंकरसिंह वाघेला यांनी पाण्याचा मुद्दा उपस्थित केला. कच्छ, सौराष्ट्र, उत्तर गुजरातमधील अनेक भागात पाण्याची समस्या भासू लागली आहे. प्रश्नोत्तराच्या तासात या मुद्द्यावर चर्चा व्हावी, अशी मागणी वाघेला यांनी लावून धरली, परंतु विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर काँग्रेसच्या आमदारांनी बाके वाजवण्यास सुरुवात केली. घोषणाबाजी केली. काही आमदार तर सभागृहाच्या मध्यभागी येऊन निदर्शने करू लागले. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या आमदारांचे एक दिवसासाठी निलंबन केले. ही कारवाई 40 आमदारांवर करण्यात आली. त्यानंतर मार्शलच्या मदतीने गोंधळ घालणा-या आमदारांना सभागृहाबाहेर काढण्यात आले. प्रश्नोत्तरानंतर राज्याचे अर्थमंत्री नितीन पटेल यांनी हे निलंबन मागे घेण्यात यावे, अशी विनंती अध्यक्षांना केली, परंतु अध्यक्षांनी ही विनंती फेटाळली.

आमदारांनी बेशिस्तीचे दर्शन घडवले आहे. मला सत्ताधारी पक्षाकडून निलंबनाचा प्रस्ताव नव्हता. मी स्वप्रेरणेने हा निर्णय घेतल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केले.