सूरत । गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रथमच सूरतला आलेल्या आनंदीबेन पटेल यांनी त्यांच्या भाषणात मुलांसाठी ‘रिजेक्टेड माल’ असा शब्दप्रयोग केला.
गुजरातमध्ये ‘स्कूल प्रवेशोत्सव’ अभियानांतर्गत एका सोहळ्यासाठी गुरुवारी त्या सूरतला पोहोचल्या. महानगरपालिकेच्या एका शाळेत त्यांच्या हस्ते प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. प्रवेशोत्सवानंतर केलेल्या भाषणात त्यांनी गुजरातमध्ये शिक्षण अभियानाला जोर देण्याचा मुद्दा मांडला. याच दरम्यान त्यांनी मुलीच्या महत्त्वाबाबच बोलायला सुरुवात केली. मुलींच्या घटत्या संख्येबाबत बोलताना त्या म्हणाल्या, 'मुलींची संख्या घटने ही एका दृष्टीने चांगली बाब आहे. कारण त्याचा मुलींनाच अधिक फायदा होणार आहे.'
हेच उदाहरणासह समजावताना त्या म्हणाल्या की, ' जर मुलींची संख्या कमी असेल, तर त्यांना आपल्यासाठी मुलगा निवडणे अवघड ठरणार नाही. त्यामुळे त्यांना कमी शिकलेल्या किंवा अशिक्षित किंवा गावठी मुलांना रिजेक्टेड मालाप्रमाणे रिजेक्ट करता येईल.' आनंदीबेन पटेल एवढ्यावरच थांबल्या नाहीत. तर त्या पुढे म्हणाल्या, ' आज मोठ्या प्रमाणावर उच्चशिक्षित मुलींचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे त्यांची संख्या कमी झाली तर प्रश्नचिन्ह मुलीवर नाही, तर मुलावर उभे केले जातील. कारण त्यामुळे मुली आपल्याला जास्त शिकलेल्या मुलाबरोबर लग्न करायचे आहे, हे स्पष्टपणे सांगू शकतील. '
फोटो कॅप्शन - सूरतच्या महानगर पालिकेच्या शाळेत भाषण देताना गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल
कार्यक्रमाचे इतर फोटो पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइडवर..